काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिले मुख्याधिकारी यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-नगर परिषद अंतर्गत येत असलेले 12 गावामध्ये नाल्याची साफसफाई बरोबर होत नाही, कचरा गाडी पुर्णपणे कचरा नेत नाही व फोंगिग मशीनद्वारे धुरफवारणी बरोबर होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच दररोज सकाळी विद्यार्थी शाळेत जातात आणि नास्त्याचे दुकाने उघडतात व मोटर वाहन चालू होते त्यावेळी सफाई कर्मचारी आपले सफाई मुख्य मार्गावर सुरू करतात आणि 11 ते 12 वाजे पर्यंत सफाई चालू राहते त्यामुळे रस्त्यावर कचरा जमा राहतो पुर्ण सफाई होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. स्वच्छता विभागातील सफाई कर्मचारी पहाटे 5 वाजता पासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे रस्ता सफाई करण्यात यावा आणि शहरातल्या नाल्या उपसा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु पूर्णपणे नाल्या साफ केल्या जात नाही.
अर्धी नाली उपसा होतो आणि अर्धी होत नाही ज्या नालीवर सामान असतात त्या सामनाला उचलत नाही. आणि पूर्णपणे उपसा करत नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फोगिंग मशीनने नगर परिषद चिमूर अंतर्गत येत असलेल्या सर्व वार्डामध्ये धुरफवारणी करणे अति आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागात काटेरी झाड खूप वाढलेली असल्याने येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत आहे. काटेरी झाडाच्या किनाऱ्याने पाणी साचून दुर्गंधी पसरली जाते तिथे डुक्कर आपले पिल्ले घेऊन असतात त्याचा विचार करण्यात यावा, कोर्टाजवळील(न्यायालय) सार्वजनिक शौचालय बांधलेले आहे परंतु वापरात येत नाही . कारण तिथे पाणी राहत नाही कुलूप लावून असते असे अनेक प्रकार आहेत करीता याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे निवेदन काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी दिले.