Breaking News

प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे : पर्यावरण संवर्धना विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले.

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि बालक मंदिर संस्था कल्याण व सार्वजनिक वाचनालय कल्याण यांच्या सहकार्यातून सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजेत या विषयी तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या मध्ये पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ कवी विसुभाऊ बापट, राजन लाखे, अभिनेते निमिष कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी, डाॅ आशिष धडस, डाॅ योगेश जोशी, हेमंत नेहते आदी मान्यवर उपस्थित होते

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved