Breaking News

कृष्णापुर येथे नवरात्र पार्श्वभुमीवर मोठ्या उत्साहात दुर्गा मातेचे आगमन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कृष्णापुर या छोट्या गावांमध्ये मोठ्या उत्साहात दुर्गा मातेच्या आगमना प्रीत्यर्थ गावात मोठ्या आनंदाने जागोजागी रांगोळी काढण्यात आले तोरण पताका बांधून नवरात्र हा हिंदू समाजामध्ये एक शुभ सण म्हणून नव दिवस साजरा केला जातो. ज्या नवरात्री मध्ये भक्त दुर्गा देवीच्या नव रुपांची पूजा करतात.विशेष म्हणजे नवरात्री मध्ये भक्त गण खास करून नव दिवस उपासना केली जाते.नवरात्र हा सण प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.प्रारंभी तो कृषी लोकोत्सव होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घरा खालच्या स्थंडीलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषीविषयक स्वारूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला.

हि चालत आलेली परंपरा कृष्णापुरा गावातील हिंदू बांधवानी नवरात्र पार्श्वपर्वावर या खुशीच्या वातावरनात आनंदने बाल युवक दुर्गा उत्सव मंडळ व गावकरी मंडळीनी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीच्या दर्शनासाठी वाजत गाजत संपुर्ण गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावचे प्रतिष्ठित अरविंद गेडेकर,ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच प्रशांत गुरनुले. मनोज भुजाडे,आनंदराव भोयर, रूपराव देशमुख, प्रमोद गेडेकर, राजेश कामडे, गोपाल ठाकरे, दिलीप डाखोरे, वामनराव गुरनुले, नरेंद्र गुरनुले, शंकर येंडे.सुधाकर भुजाडे रमेश जुनघरे, गजानन रामगडे, राजेंद्र डाखोरे, प्रभाकर कामडे, हरिचंद्र राऊत, दिनेश गुरनूले ,नरेश भुजाडे, मनोहर गुरनुले मोरेश्वर भुजाडे, शंकर चौधरी, दिनेश कामडे, कुंडलिक खेडेकर,मंगेश कामडे,नरेश कामडे, मंगेश तिवडे महेश कामडे, रामू गाऊत्रे,राजेंद्र गाऊत्रे, गुरुदेव यादव, अतुल चौधरी, दिंगबर भोयर, रमेश देशमुख,आदी गावकरी मंडळी च्या उपस्थित बाल युवक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश जूनघरे, रितेश कामडे,योगेश डाखोरे, मयूर गेडेकर, आदित्य राऊत, प्रविण ठाकरे,निकेश भुजाडे, सागर ठाकरे,सागर भुजाडे,विशाल गाऊत्रे, आकाश गाऊत्रे, रोशन कामडे, विरेंद्र गुरनुले, नरेश जुनघरे, यश भुजाडे,अक्षय भुजाडे, संदीप कामडे, या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवरात्र उत्साहात मोठ्या आनंदाने साजरा करण्याच्या संकल्प करून कृष्णापुर येथे दुर्गा मातेच्या मंडपात दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved