Breaking News

शेवगाव शहरामध्ये साखर कारखान्यांचे उसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रक आणि जुगाड ट्रॅक्टर यामुळे तासन तास वाहतूक कोंडी???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव-9960052855

शेवगांव:-शेवगांव शहरांमध्ये सध्या दिवसभर विविध सहकारी साखर कारखाने यांची अवजड वाहने दिवसा शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक जाम करताना दिसत आहेत शेजारच्या तालुक्यातील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना केदारेश्वर सहकारी साखर कारखाना गंगामाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांचा वाहतुकीचा केंद्रबिंदू शेवगाव शहर असल्याने व सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शेवगाव चा जायकवाडीचा धरणपट्टा येत असल्याने या भागातून कारखान्यांकडे सकाळी सहा ते रात्री 10 या रहदारीच्या काळात सर्वसामान्य शेवगा करांचे जीवाशी खेळत राजरोस उसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रक आणि जुगाड ट्रॅक्टर यामुळे तासन तास वाहतूक कोंडी भर रस्त्यामध्ये आपली उसाने भरलेली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून ड्रायव्हर मंडळी शहरांमधील दारूचे गुत्ते जेवणाची हॉटेल येथे तासनतास रेंगाळत असतात.

यामुळे शहरातील दुचाकी स्वार पादचारी अबाल वृद्ध व महिलावर्ग आपला जीव मोठे धरून नित्यसेवा चौक गांधी पुतळा क्रांती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संत गाडगेबाबा चौक नेवासा रोड मिरी रोड गेवराई रोड शहरातील प्रमुख तीन राज्य महामार्ग व इतर दोन मार्ग कायम वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र असते पण या विना क्रमांकाच्या वाहतुकीला व दिवसा रहदारीच्या वेळी सकाळी सहा ते रात्री 10 शहरातून बंद करण्याची मागणी सर्वसामान्य शेवगावकर करत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये या वाहनांमध्ये अडकून अनेक बळी गेले आहेत प्रशासन अजून किती बळी गेल्यानंतर दिवसा अवजड वाहतूक शहरातून बंद करणार आहे अशी मागणी सर्वसामान्य शेवगावकर करत आहे.

*ताजा कलम*

*नंबर नसलेल्या ट्रॉल्या व एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या यावर कायमची बंदी असताना सुद्धा अहमदनगरचा आरटीओ विभाग शेवगाव वाहतूक पोलीस यांच्या निदर्शनास कसा येत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे शहरापासून काही ठराविक अंतरावर आरटीओ ऑफिस चे वाहन संबंधित वाहनांकडून कलेक्शन करताना बऱ्याच लोकांनी पाहिले आहे*

*विशेष बाब*

*विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली व मोठ्या कर्णकर कसे आवाजात गाणी वाजवून या अवजड वाहनांनी अपघात केल्यास नेमकी तक्रार कोणाच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये करायची हा अपघात ग्रस्तांना प्रश्न पडतो*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved