Breaking News

शेवगांव शहरातील मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या येत्या 23 तारखेला होणाऱ्या सभे साठी सकल मराठा समाज शेवगांव यांचे जाहीर आवाहन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960052755

शेवगांव:-शेवगांव तालुक्यातील सर्व समाज बांधवाना जाहीर विनंती करण्यात येते की, मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची गरजवंत मराठ्यांचे आरक्षण साठी शेवगाव मध्ये गुरुवारी दिनांक १३ ला दुपारी एक वाजता जाहीर सभा होत आहे, त्या सभेला येण्यासाठी गावोगावी मराठा तरुणांनी पुढाकार घेऊन जागृती करावी असे आवाहन करण्यात आले.

१ ). भायगाव मधून ते आपल्या तालुक्यात प्रवेश करणार आहेत , त्या परिसरातील तरुणांनी भात कुड गाव फाट्यावर त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्याचे नियोजन करावे.
२). परिसरातील तरुणांनी पुढाकार घेऊन जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ता फ्या बरोबर रॅली काढत यावे.
३ ). शेवगाव ला सभेला येताना ग्रामीण . भागातील तरुणांनी मोटार सायकल रॅली, भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि वाजत गाजत यावे
४ ). आपल्या भागात सभेचे बॅनर लावावे.
५ ). कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत, आपल आरक्षण आता टप्प्यात आल आहे.
६ ). माता भगिनी यांची जास्तीत जास्त उपस्थिती कशी राहील याचे नियोजन करण्यात यावे.
आपल घरचं कार्य आहे असे समजून नियोजन करावे, सभेला यावच लागत, कारण प्रश्न आपल्या लेकरा बाळाच्या भविष्याचा आहे .
सकल मराठा समाज शेवगाव तालुका
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा ही विनंती .

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved