Breaking News

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या व इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी तसेच इयत्ता 6 ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांबुळघाट, ता. चिमुर येथे प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, अशा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक / शिक्षक / मुख्याध्यापक यांनी सविस्तर माहिती व परीक्षा आवेदन पत्रासाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क करावा. आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनुसूचित जमाती व आदिम जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी केले आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved