Breaking News

लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे ‘लोकशाही’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर लॉंच

मुंबई-राम कोंडीलकर

मुंबई:-शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.’ याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच सर्व सोशल मिडियावर प्रदर्शित होऊन महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने पसरत आहे.

सुशीलकुमार अग्रवाल निर्मित आणि संजय अमर दिग्दर्शित ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. पोस्टरमध्ये उंच इमारती आणि त्यांना लागूनच असणारे झोपडपट्टी दिसत आहेत. पांढरपेशी भांडवलदारांनी तयार केलेलं स्वत:चं अलिशान शिखर आणि भांडवलदारांच्या भागीदारीत तेवढ्याच हिस्याचे पात्र असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित लोकांचे कदाचित ते प्रतीक असल्याचे दिसत आहे. तसेच लालभडक धुकट वातावरण आणि चित्रपटाचे नाव, एकूणच चित्रपट राजकारणाशी संबंधित संघर्षाला चिन्हांकित करत असल्याचे दिसत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved