प्रतिनिधी-भद्रावती
भद्रावती:-श्री स्वराज्य वीर संघटना,भद्रावती चे प्रमुख विश्वस्त कार्यकारणी सदस्य निखिल सुनिल बावणे व शंकर तिमाजी बावणे गडकिल्ले ऐतिहासिक मोहिम करिता भद्रावती, जि. चंद्रपूर वरून प्रस्थान केले आहे . थेट श्री किल्ले रायरेश्वर, त.भोर, जि. पुणे ते श्री किल्ले प्रतापगड,जि. सातारा मार्गें श्रीक्षेत्र महाबळेश्वर अशी हि गडकोट भ्रमण पायदळ चालत जाण्याची मोहिम आहे.
महत्वाचे म्हणजे हे दोन नव शिवप्रेमी युवक महाराज त्या काळात जे मोहिम आखायचे ते क्षण जगायला गेले आहे सर्व गोष्टींचा त्याग करून आणि प्रमुख बाब म्हणजे यांनी डोंगर, नदी, वनराई, दर्या-खोऱ्या पायदळ पार करून मोहीम फत्ते करणार आहे यांच्या सह चंद्रपुर व वरोरा वरून पण शिवप्रेमी यांना जुळलेले आहे.रायरेश्वर किल्ला म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16 व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती या ठिकाणाहून तर प्रतापगड किल्ला म्हणजे जिथे महाराजांनी क्रूर निर्दयी अफझलखानला ठार मारले होते हे ठिकाण आहे.