जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ सौभाग्य नगर नागपूर येथे तिळ संक्रांती महोत्सहाचे आयोजन सौ वंदना विनोद बरडे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.१०० महिलांनाच्या उपस्थितीत ह्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रा याविषयी वंदना विनोद बरडे यांनी माहिती दिली आणि पोस्टर प्रदर्शन लावून त्यावर मार्गदर्शन केले. तसेच आरोग्याचे पोस्टर प्रदर्शन लावून त्यावर मार्गदर्शन केले. पांमप्लेट वाटून त्याची माहिती दिली.
जसे गर्भाशयाचा कॅन्सर, आनीमिया मुक्त भारत, लोहाची कमतरता,स्वच्छता, आहारविहार, आरोग्यदायी जीवनशैली, खानपान, रहनसहन आचारविचार इत्यादी विषयांवर पोष्टर व पामप्लेट, याद्वारे मार्गदर्शन केले व त्यांचा प्रचार व प्रसार केला आणि दुसऱ्यांना सांगण्याचे आव्हान केलें. लहान मुलांना विषयी जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारे समजून सांगितले. आजची मुल ही भावी भविष्य पिढी आहे. त्याप्रमाणे त्यांना सुसंस्कृत करणे सर्वांचं कर्तव्य आहे. त्यानंतर सर्वांसाठी खेळाचे आयोजन करण्यात आले. लहान मोठ्यांनी सर्वांनी खेळाचा आनंद घेतला. सोबत बीसी चा कार्यक्रम घेण्यात आला. तिळगूळ व वान देऊन उखाणे घेऊन व जेवणाचा आस्वाद घेऊन मनमुराद आनंद सर्वांनी लुटला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना बरडे यांनी केले.
रजनी कालमेघ यांनी आध्यात्म, डॉक्टर.रेखा सपकाळ यांनी कॅन्सर, डॉक्टर वंदना गाडवे दंत चिकित्सा,आरती सावलकर यांनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, आपले विचार मांडले.८० ८५, वय व दोन महित्यात हृदयाचे आप्रेशन झालेल्या वयोवृदध स्त्रियांनी या महोत्सवसात भाग घेतला आणि पुरेपूर आनंद घेतला.कोणी कविता तर कोणी गाणी, कोणी डान्स तर अक्टिंग करुन तिळ संक्रांती महोत्सव,मेळावा आनंदात पार पडला. यासाठी वंदना बरडे, ज्योती कापडे, वंदना लोही संजीवनी घुरडे, अश्विनी उरकुडे, कामिनी तवले, विद्या सोनग्रे प्रिती थोटे, यांनी मेहनत घेतली.