Breaking News

चिमूरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न

रिंगण सोहळा ठरले विशेष आकर्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूरच्या वतीने दिनांक २० व २१ जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवाची विविध कार्यक्रमांनी सांगता झाली.चावडी मोहल्ला चिमूर येथे दि. २० जानेवारीला सकाळी ६ वा. परिसर स्वच्छता व मूर्ती पूजन व घटस्थापना करण्यात आली. दुपारी १ वा. महिला मेळावा व महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वा. मोटारसायकल रॅली तर सायंकाळी ७ वा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मूकबधिर विद्यालय शाळेचे विद्यार्थी चिमूर सहभागी व तेली समाजातील मुला-मुलींचे गीत नृत्य सादर केले.

दि. २१ जानेवारीला परिसर स्वछता व सकाळी ८:३० वाजता संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघाली. यात अमरावती येथील वारकरी रिंगण सोहळा विशेष आकर्षण ठरले. दुपारी १ वाजता गुण गौरव सोहळा, बक्षीस वितरण व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव पिसे होते तर उद्घाटन विदर्भ तेली समाज मुख्य संघटक प्रा. रमेश पिसे, यांचे हस्ते संपन्न झाले.

पोलिस निरीक्षक मनोज गभणे, सत्यशोधक संघटनेच्या राज्य अध्यक्षा वंदना वनकर, संजय सोनटक्के. धनराज मुंगले. राजू अगडे. उमेश हिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अडव्होकेट धनराज वंजारी. संचालन प्रा.पितांबर पिसे तर आभार प्रदर्शन श्रीहरी सातपुते यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ व सर्व समाज बांधव भगिनींनी अथक परिश्रम घेतले

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved