Breaking News

रामलल्लाच्या महाआरतीने अवघे चिमूर शहर राममय – गणेश मंडळाने केले आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सोमवारी जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथे रामलल्लाच्या महाआरतीने अवघे चिमूर राममय झाले होते.अयोध्या येथे भव्य दिव्य रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. चिमूर येथे श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्डच्या वतीने रामलल्लाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते व उपाध्यक्ष श्याम बंग यांचे हस्ते पूजन करण्यात आले.

या प्रसंगी. शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. भारतीय युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बंटी वणकर. समीर राचलवार. काँग्रेसचे निखिल डोईजड. बंटी शिंदे. भाग्यश्री पतसंस्थेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड. बालाजी देवस्थानचे व्यवस्थापक अरविंद गोठे उपस्थित होते. महाआरती नंतर प्रसाद वाटप करून फटाक्याच्या आतिशबाजीने महाआरतीचा समारोप करण्यात आला.यावेळी. मनोज कठाने. मिलिंद सातपुते. अंकुश जुंमडे. रवी सातपुते. समीर मांकोडे. गजानन बावनकर. शुभम सातपुते. निखिल कामडी. हेमंत भोपे. प्रशांत भोपे. वृषभ सातपुते. कलपक भोपे. पलाश तळवेकर. वेदांत मिसार आयुष लबडे. करण दडमल व सर्व रामभक्तांनी अथक परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved