Breaking News

शांतीवन बुद्ध विहाराचा 10 वर्धापन दिन 27 व 28 फरवरीला होणार पाथरी (चिचाळ )येथे साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहाराचा 10 वा वर्धापन दिन 27 व 28 फरवरी 2024 ला इंदिरा सागर गोसेखुर्द धरणाला लागून असलेले शांतीवन बुद्ध विहार (पाथरी) चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे उत्साहात साजरा होणार आहे.

27 फरवरी 2024 ला भिक्षू संघाचे भोजनदान व उपासक-उपासिकांचे भोजनदान सायंकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत होईल . रात्री 10 ते 2 पर्यंत महापरित्राण पाठ होईल.
28 फरवरी 2024 ला सकाळी 9 ते सकाळी 11 पर्यंत पंचशील ध्वजारोहण, त्रिसरण पंचशील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवाद , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी संत गाडगेबाबा प्रियदर्शी सम्राट अशोक यांना अभिवादन व बोधी वृक्ष पूजा , शिवली बोधी पूजा भिक्षू संघाद्वारे करण्यात येईल .सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भिक्षू संघाचे भोजनदान दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उपासक उपासिकांचे व उपस्थित नागरिकांचे भोजनदान., 1 ते दुपारी 2 पर्यंत धम्मदेसना व संघदान, दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रम होईल.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे भंडारा यांच्या हस्ते होईल .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सत्यपाल काटकर माजी प्राचार्य मनोज मनोचिकित्सक व शैक्षणिक समुपदेशक वरोरा चंद्रपूर हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत मिसाळे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा, रोशन जांभुळकर अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा, संजीव भांबोरे पत्रकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटना, मधुसूदन काटेखाये सरपंच ग्रामपंचायत चिचाळ ,सविताताई नरेंद्र बिलवने पंचायत समिती सदस्य ,सुवर्णा रामटेके पंचायत समिती सदस्य पवनी ,शिवाजी कदम सामाजिक कार्यकर्ता उल्हासनगर मुंबई , शालू कृपाले कवियीत्री व सामाजिक सामाजिक कार्यकर्त्या गोंदिया , श्यामलाल रामटेके माजी सरपंच महादेवजी उके विश्वास राऊत शांतीनगर नागपूर, विशाल बावीटाले सामाजिक कार्यकर्ता नागपूर, दिलीप रामटेके माजी सरपंच चिचाळ, कृष्णाजी बोरकर धम्म प्रचारक शांतीनगर नागपूर, सूर्यभानजी शेंडे( गायक) सामाजिक कार्यकर्ता शांतीनगर नागपूर, पृथ्वीराज शेंडे प्रभारी बीएसपी कावळा पेठनागपूर , भोलानाथ बौद्ध सामाजिक कार्यकर्ता नागपूर ,संजय घोडके सामाजिक कार्यकर्ता ,राजकुमार वाहने सामाजिक कार्यकर्ता माडगी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

सायंकाळी ५ ते६वाजेपर्यंत बुद्ध भीम गीते व सांस्कृतिक कार्यक्रम होईल .सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर व त्यांचा संच नागपूर हिंगणा यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम होईल .कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शांतीवन बौद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध, धम्मरक्षित जीवनबोधी बौद्ध ,अश्विन जीवनबोधी बौद्ध ,आशिष मेश्राम यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved