Breaking News

ढीवर समाजाची एकता ही परिवर्तन घडवेल -प्रा. के. एन. नान्हे

ढोरवाडा येथे एकलव्य सेना कार्यकर्ता संमेलन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

( भंडारा)- अनेक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त ढीवर समाजाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये चार हजाराच्या जवळपास घरकुल मंजूर होऊन सुद्धा संपूर्ण निधी अजून उपलब्ध झालेला नाही . ज्यामुळे अनेक कवेलू आणि मातीचे घर असलेले लाभार्थी घरकुलाची वाट पाहत आहेत. दहावी अगोदरच विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण हे 80 टक्के आहे. ज्यामुळे समाजाची मोठी पिढी शिक्षणापासून वंचित राहिलेली आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करणारा समाज आजही गरिबीत खीतपत पडला आहे. राज्यातील सधन समाज हा आरक्षणाची मागणी करत आहे. परंतु ज्या समाजाला सर्वात जास्त आरक्षणाची गरज आहे त्या समाजाबद्दल शासन ब्र सुद्धा काढत नाही आहे.

ढीवर समाज हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व बाबतीमध्ये अति मागासलेला आहे. जर आज सर्वेक्षण झालं तर हे शासनाला कडून चुकेल की सर्वात जास्त गरज आरक्षणाची ज्या समाजाला आहे तो म्हणजे भटक्या वीमुक्त समाज आहे. सदर सभेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सरसकट ओबीसी मधून आरक्षण मागत आहे परंतु त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये असा ठराव मांडण्यात आला त्यांच्यामध्ये श्रीमंत मराठा व गरीब मराठा असे दोन वर्ग आहेत श्रीमंत मराठा हा गडगंज संपत्ती असलेला समाज आहे परंतु गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे अशी मांडणी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांना वाचा फुटावी म्हणून तुमसर तालुका ढोरवाडा येथे दिनांक 10 फेब्रु. 2024 रोज शनिवार ला कार्यकर्ता संमेलन घेण्यात आले.कार्यक्रमामध्ये मुख्य मार्गदर्शन एकलव्य सेना संस्थापक मा. प्राचार्य के. एन. नान्हे सर यांनी केले. उपमुख्य संघटक संजीव भुरे, सुरेश खंगार, सुनीताताई मोहनकर. मत्स्य जिल्हा संघ संचालिका, अनिलजी दिगोरे,संघटक एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
एकलव्य ढिवर समाज शाखा ढोरवाडा चे अध्यक्ष दिलीपजी बागड़े, दिलीपजी देवगडे सचिव, उपाध्यक्ष रवींद्र देवगडे, कोषाध्यक्ष संदीप मेश्राम, संचालक गरीबा मेश्राम, अंकुश देवगडे, गनराजजी भूरे, नंदलालजी खंगार, शिसुपाल खंगार, शास्त्रीलाल खंगार, युवराजजी मेश्राम, उमेशजी मेश्राम, रोशन खंगार, लीलाधर मेश्राम,युवराज देवगडे, देवेंद्र भूरे, राजेश बावने, हंशराज खंगार, मांसारामजी खंगार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी मनोजजी चौबे तुमसर तालुका मुख्य संघटक, राजकुमारजी मोहनकर,मत्स्य कंपनी तुमसर, सौ.सुषमाताई ज्ञानेश्वरजी भोयर सरपंच,ढोरवाडा, पुष्पाताई वैद्य सरपंच चारगाव, ज्ञानेश्वरजी भोयर माजी सरपंच ढोरवाडा, ज्ञानीरामजी बुद्धे माजी सरपंच,ढोरवाडा, यौगिता ताई अंकुशजी बुद्धे उपसरपंच ढोरवाडा, श्रीकुष्णजी बुद्धे माजी उपसरपंच ढोरवाडा,पोलिस पाटिल दामोधरजी बुद्धे ढोरवाडा,तसेच ग्रामपंचायत सदस्य,ज्ञानेश्वर कांबळे उपसरपंच (अध्यक्ष)माडगी. अस्विनजी मेश्राम उपाध्यक्ष, विजयजी देवगडे,अजय मेश्राम देव्हाडा (खुर्द ). महेंद्र मेश्राम ब्राह्मणी ,अजयजी खंगार चारगाव त्याचप्रमाणे नवेगाव, टाकडी, पिपरा,समस्त ग्रामवाशी आणि ढिवर समाज व महिला मंडळ यांची उपस्थिती होती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved