Breaking News

स्थानीक गुन्हे शाखेच्या कौशल्याने घरफोडीचा गुन्हा उघड

चंद्रपुर कारागृहातून आरोपीस घेतले ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा) – तुमसर शहरातील श्रीराम नगरातील गिरिधर बळवंतराव येरणे याची बहिन ही दि.१५ जानेवारी रोजी घराच्या वरच्या माळ्यावरील बांधकामावर पाणी मारत असताना अज्ञाताकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख असा जवळपास १ लाख २८ हजारांचा माल चोरून नेला होता. या प्रकरणी तुमसर पोलीसांनी एकाला चंद्रपूर कारागृहातून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला माल हस्तगत केला आहे.आरोपी हा भिक मागण्याच्या बहाण्यानी आपल्या ५-६ वर्षाच्या मुला- मुलींना घेऊन आला होता, मुलांना बाहेर ठेवून संधी साधून घरात शिरून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख असा जवळपास १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला, या घटनेमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांनी सांगितल्या प्रमाणे रेलवे स्टेशन देव्हाडी, तिरोडा, गोंदीया, कामठी, इतवारी, नागपुर भागातील रेलवे स्टेशन चेक करून आरोपीचा शोध घेऊन त्याला चंद्रपुर कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची अधिक चौकशी केली असता तो भटक्या जमातीचे असून झारखण्ड राज्यातील आहे. सध्या तो वर्धा येथे झोपड्या व डेरे टाकून राहत असल्याची माहिती मिळाली. त्याच्या ताब्यातून चोरीला गेले ला माल हस्तगत करून आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. सदर कारवाई वरीष्ठ पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक लोहित मतानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, साहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनात पो.नि. निलेश ब्राह्मणे स. फौ. धर्मेंद्र बोरकर, पो.ना.मार्कंड डोरले, पो.शि. नितीन झंझाड, परीमल मुलकलवार, राजकुमार गिऱ्हेपुंजे यांनी अथक परीश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीस ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याची उकल केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संडे स्पेशल दणका वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या शेवगांवच्या सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या गावपुढाऱ्यांचा मणका

!!! फक्त उदघोषना बाकी असलेल्या शेवगांव नगरपरिषदेची निवडणूक ऐन पावसाळयात होण्याची शक्यता !!! अविनाश देशमुख …

पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved