Breaking News

अल्पवयीन मुलीचा अपहरणकर्तेच्या ताब्यातून सुटका-सहाय्यक पोलीस निरीक्षकश बलभीम ननवरे

आपल्या पगारापुरती नोकरी कोणीही करतो परंतु आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे छानक्षपणे फिरून आपल्या मदतीची नेमकी कोणाला गरज आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा या वक्तीप्रमाणे मुंबई येथे नियुक्तीस असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांची समय सूचकता

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960052755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दि 08 फेब्रुवारी 2024 रोजी मा. पोलीस उप आयुक्त साहेब यांचे परवानगीने कोर्ट साक्ष कामी जिल्हा सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्ट, पुणे येथे सिंहगड एक्सप्रेस ने जात असताना ट्रेन मध्ये एक 30 वर्षीय व्यक्ती एका 8 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रवास करीत होता. प्रवासा दरम्यान ते एकत्रित डब्ब्यात होते सदर व्यक्ती त्या मुलीला तिने न मागताही खेळणी आणि खाऊ घेऊन देत होता.
त्यामुळे मुलगीही त्याच्या सोबत खुशीने प्रवास करीत असल्याचे दिसत होते. परंतु मुलगी मराठी बोलत होती आणि सदर व्यक्ती हिंदीतून बोलत होती.नन्नवरे साहेबांच्या सीट जवळच उभी असल्याने त्यांनी तिला बसायला शेजारी जागा देऊन मुलीला आई आई वडील यांच्या विषयी विचारणार केली असता आई घरी असल्याचे सांगितले. मी सदर व्यक्ती तिचा बाप असावा असे समजून तिला बोलत होतो.

पण व्यक्ती हिंदी भाषिक असल्याने त्यांनी सदर व्यक्तीला मुलगी तुमची कोण आहे ??? अशी विचारणा केली असता त्याने माझीच मुलगी असल्याचे सांगितले परंतु त्याच वेळी मुलीचा चेहरा सदर व्यक्ती तिचा बाप नसल्याचे सांगत होता. मुलीकडे गप्पा मारत असताना सदर व्यक्ती मुलीला डोळे वटारून माहिती देण्यापासून रोखत असल्याचे लक्षात आल्याने मुलीला तिच्या आई चा मोबाईल क्रमांक मागितला. त्यावेळी सदर व्यक्ती पुन्हा तिला खुणावत असल्याचे दिसले. विनाकारण आपण चौकशी करत असल्याने बापाला आवडत नसावे म्हणून साहेब पुन्हा मोबाईल मध्ये बघत बसले त्यावेळी मोबाईल मध्ये माझा युनिफॉर्म वरचा फोटो पाहून मुलीने आश्चर्याने त्यांना विचारले की तुम्ही पोलीस आहात त्यावेळी त्यांनी हो म्ह्णून मान हलवली. मुलीच्या आई ला मुली सोबत बोलणं करून द्यावं आणि नवरा बायकोच जमत नसावे आणि बाप मुलीला घेऊन जात आहे याचं कारण शोधण्यासाठी साहेबानी तिला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मागितला असता तिने मामाचा मोबाईल क्रमांक संगीतला.

त्यावेळी ती व्यक्ती मुलीला घेऊन जाण्यास निघाली तेंव्हा त्यांनी त्यास पुन्हा नाते विचारले असता त्याने माझी बहीण असल्याचे सांगितले. मग लागलीच त्याला पकडून खाली बसवले व मुलीच्या मामाला कॉल करून विचारपूस केली असता काही वेळातच मुलीच्या आई वडिलांचा कॉल आला आणि मुलगी घरातून शाळेला गेलेली परत आली नसल्याचे समजले त्यावेळी त्यांना नन्नवरे साहेबांनी ओळख करून देऊन मुलगी सुखरूप असून मुलगी सुरक्षित पुणे लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करू असे सांगून मुलीचे आई वडिलांना वालीव पोलीस ठाणे, मीरा – भाईंदर, वसई – विरार येथे गुन्हा दाखल करण्यास सांगितले. लोहमार्ग पोलीस ठाणे येथे ट्रेन मधील नागरिकांच्या मदतीने (लोणावळा पासून लोहमार्ग चा एक अंमलदार मदतीला लोहामार्ग नियंत्रण कक्षाकडून मिळाला ) मुलगी व आरोपीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांचे ताब्यात सुखरूप दिले आहे. मुलीचा मामा सचिन शेलार यास पुणे स्टेशन येथे त्यांनी स्वतः बोलावून घेतले होते. याबाबत सदर व्यक्तीच्या विरोधात वालीव पोलीस ठाणे गु र नं 79/2024, कलम 363 भा द वि नुसार दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव :- दयानंदकुमार शर्मा, वय अंदाजे 30 वर्षे, रा – मूळ बिहार

*ताजा कलम*

आपले कर्तव्य बजावत असताना केलेल्या सामाजिक कार्याला त्याची बोर्डा मुलीच्या वाचवलेला जीव मुंबई येथे नियुक्तीस असलेले श्री बलभीम नन्नवरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्याकडून उत्तरोत्तर अशी समाजसेवा घडो असे कर्तव्यदक्ष अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झाले पाहिजे त्यामुळे गुन्हेगारांवर अंकुश बसेल “मी शेवगावकर” “राम इनाम बचाव कृती समिती” “मानवाधिकार आयोग’ अहमदनगर या सर्व संस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन*

बलभीम ननवरे
सहा पोलीस निरीक्षक
स.पो. नायगाव, प्रतिनियुक्तीने
इलेक्शन सेल, अभियान,
बृहन्मुंबई
मो नं 8275462495

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved