Breaking News

उभ्या महाराष्ट्राला आदर्श देणारा शिवजन्मोत्सव सोहळा

भव्य मोफत चष्मे वाटप व आरोग्य शिबिराचे आयोजन

शिबीर मध्ये 1000 लोकांचे निदान

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर/मौदा:-अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासाची संस्कृती आणि शौर्याची गाथा सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव साप्ताहिक शिवजयंती महोत्सव शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत दि 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान मौदा येथे साजरा करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर शिवबा राजे फाउंडेशन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 5 वर्षापासून साप्ताहिक शिवजन्मोत्सव स्वरूपात साजरी करत आहे . साप्ताहिक स्वरूपात शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचा उद्देश म्हणजे “महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण व्हावा व जयंती साजरी करण्याचे स्वरूप कुठेतरी बदलावे” आदर्श व्यक्तींचा वारसा उक्ति तून नाही. तर कृतीतून जोपासला जावा,विविध बाबतीत विखुरलेला समाज एकत्र यावा,सुदृढ, सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा.,समाजाच्या नव उभारणीत तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे
याच मुख्य हेतूने शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे कडून साप्ताहिक शिवजयंती साजरी करण्यात येते.

13 फेब्रुवारी किल्ले बनवा स्पर्धा आणि उद्घाटन सोहळा चे आयोजन करण्यात आले किल्ले बनवा स्पर्धा 50 मुलांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट अशे किल्ले उभारले.14 फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा आणि कोण होणार बुद्धिवंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 15 फेब्रुवारी रोजी शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले . यामध्ये जवळपास आठ संस्थांकडून उत्कृष्ट कलेचे सादरीकरण करण्यात आले. 16 फेब्रुवारी रोजी महानाट्य आणि सुप्रसिद्ध गायक बापू जाधव यांचा पोवाडा आयोजित करण्यात आला. 17 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक महोत्सव आणि महाराष्ट्राची प्रयोगात्मक लोककला या दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक महोत्सवामध्ये जवळपास बारा शाळांचा सहभाग नोंदवण्यात आला. 18 फेब्रुवारी रोजी महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 300 स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला.19 फेब्रुवारी रोजी सकाळी भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

शिबीर मध्ये 1000 लोकांचे निदान करण्यात येऊन त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. सायंकाळी 7:00 वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये भव्य मशाल मिरवणूक काढण्यात येऊन मिरवणुकीमध्ये महाराष्ट्राचे चारशे वर्षाचं वैभव मुख्य आकर्षणाचं केंद्र ह्या वेळी दिसून आले. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,रमाई,सिंधुताई सपकाळ यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या. शिवजयंती हि नाचून नाही,तर ह्या महापुरुषांना वाचून साजरी करायची असा संदेश ह्या वेळी त्यांनी दिला.फाउंडेशन ने वैचारिक जयंती साजरी करून एक उत्तम उदाहरण सर्व समाजासमोर प्रस्तुत केले.फाउंडेशन चे सर्व समाजातून फार कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.कार्यक्रमाच्या यस्वीतेकरीता शिवबा राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य युवक-युवती, महिला पुरुष वर्ग प्रामुख्याने उपस्थित.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved