Breaking News

बरडघाट येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली मेश्राम होत्या.प्रमुख अतिथी म्हणून स्वाती श्रीरामे,करुणा मेश्राम,सुनीता बारेकर, सोनाली बारेकर,वनश्री दडमल,प्रिया मेश्राम,अलिशा दोडके,तारा दोडके,वनिता शेंडे,सरिता भोयर,साधना श्रीरामे,संजीवनी दोडके,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते.

पाहुण्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा,अनिष्ट रुढी,बुवाबाजी,अज्ञान,सावकारी पाश,अस्वच्छता,जातीभेद यांवर गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातून प्रहार केले.समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आयुष्यभर गावोगावी फिरत राहिले. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले आयुष्य वेचले.गाडगेबाबांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत.त्यांच्या विचारांचा आपण अंगीकार केला पाहिजे तरच समाज प्रगती करेल असे प्रतिपादन सुरेश डांगे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन वर्ग चौथीची विद्यार्थीनी तेजस्विनी भोयर हिने केले.आभार अर्चना डफ यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved