Breaking News

म.रा.प्रा.शिक्षक भारतीचे शिक्षणमंत्र्यांना विविध समस्यांचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-म.रा.प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने विविध समस्यांचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.या निवेदनात पुढील मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या.आंतरजिल्हा/जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया तात्काळ करावी,गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे संपकालीन वेतन अदा करणेबाबत,निवडश्रेणी/ चट्टोपाध्याय प्रस्ताव मार्गी लावणे बाबतच्या सूचना निर्गमित करणे,केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तातडीने घेण्यात येण्याबाबत,राज्यातील वीस पटसंख्येच्याखालील शाळा बंद करण्यात येऊ नये,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करणाऱ्या समूह शाळा योजनेला कायमस्वरूपी स्थगित करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

याप्रसंगी शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,म.रा.प्रा.शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे, विभागीय प्रसिद्धीप्रमुख संतोष बाऱ्हेवार,रावन शेरकुरे,कैलास हांडगे,विनोद चौधरी,शंकर चव्हाण,एम.एस.बिसेन,कटरे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved