Breaking News

शेअर मार्केट वाले फरार होण्याची मालिका काही थांबेना

गदेवाडी येथील अक्षय इंगळे तीस कोटी रुपये घेऊन फरार गुंतवणूकदार हवालदिन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील आणखी एक बिग बोल शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांकडून सुमारे 30 कोटी रुपये गोळा करून काल रात्री फरार झाला शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फसवून कोट्यावधी रुपयांचा चुना लावण्याची मालिका काही थांबण्याचं नाव घे ना शेवगाव पोलीस व अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासन यांचे या सर्व प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे { पोलीस विभागाच्या गुप्त खात्यामार्फत सी.आय.डी. चौकशी करायला काय हरकत होती } यापूर्वी तालुक्यातून गोरे बंधू पातकळ झिरपे कोकाटे विघ्ने आणि इतर चार-पाच जण व आता इंगळे एका मागोमाग दिवाळखोरी जाहीर केल्याने व फरार झाल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे ज्यांना अधिक व्याजाची हाव आहे अशा लोकांची फसवणूक झाल्याने “तेल गेलं तूप गेला आणि हाती धुपाटन आल” अशी अवस्था जास्त व्याजाच्या नादात मुद्दलच गायब झाली कपाळावर हात मारून घेण्याची पाळी शेवगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांवर आली आहे काही गुंतवणूकदार पर आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत याला जबाबदार कोण ???

*ताजा कलम*

गेल्या आठवड्यात फरार झालेल्या एका बिग बुल णे फेसबुक वर लोकांना आणि गुंतवणूकदारांना आव्हान केले आहे की मी माझं वावर विकून तुमची निम्मे पैसे देईल अरे भिकार चोटा तुझी प्रॉपर्टी विकायला लोकांनी तुझ्याकडे पैसे गुंतवले होते का आलिशान गाड्या लक्झोरीयस लाइफ सोन नान हे सर्व लोकांच्या पैशाने करताना लाज वाटली नाही का तुझा वावर विकून लोकांचे कोट्यावधी रुपये कसे देणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत

*{ क्रमशः }*

*शहरापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कार्यालय मध्ये व्याजाचा परतावा घेण्यासाठी गेल्या आठवड्यापासून लोकांच्याकरा मारत आहे त्यांना तो भामटा बिगबूल म्हणतो तीन महिने थांबा म्हणजे हाही जाण्याच्या मार्गावर आहे तो कोण ???*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved