मटेरियल वाचविण्याचा नादात नालीची उंची केली कमी–ठेकेदाराची मुजोरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर वडाळा पैकू येथील चिमूर – कांपा रोडवर पिसे पेट्रोल पंप ते संताजी नगर पर्यत दोपदरी मार्गाचे बांधकाम करण्यात आले पण संताजी नगर मधील दोपदरी रस्त्याच्या बाजुला नालीचे बांधकाम न करताच सोडून गेले.परंतू कवडू लोहकरे कडुन सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर चे अभियंता समीर उपगन्लावार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आणी लगेच कामाला सुरुवात केली.
परंतू काम करतांना मटेरियल वाचविण्यासाठी नालीची उंची कमी करुण संताजी नगर वासियांसाठी पुराचा धोका निर्माण केला.ठेकेदार यांना संताजी नगर वासियांनी धोका समजावून सांगितला परंतु ठेकेदारांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन काम पुन्हा सुरू करूण मुजोरी दाखविली.सार्वजनिक बांधकाम विभागानेसुद्धा ठेकेदाराची बाजू घेऊन आपण एक आहोत हे सिद्ध केले.तात्काळ नालीची उंची वाढवून सांडपाणी जाण्याचा मार्ग सुकर करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली.