Breaking News

नगरपरिषद शेवगांव ला फसवणाऱ्या भामट्या पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर चा मोडला मनका

” एक कोटी 56 लाख 60 हजाराची बनावट बँक गॅरंटी आणि किल्ले धारूर तालुका बीड येथील बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याने इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री सुनील कुमार नागरगोजे यांच्यावर नगरपरिषद चव्हाण एकला 420 चा गुन्हा दाखल “

{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक- 02/02/2023 रोजी पाणी पुरवठा योजनेची टेन्डर प्रक्रिया सुरु झाली. शेवगाव शहरात नगरपरिषद मार्फत महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानंतर्गत पाणी पुरवठा योजनेची टेन्डर प्रक्रियेची निवेदा “ईद्रायणी कन्स्ट्रक्शन” संभाजीनगर यांनी भरतेवेळी त्यांचे अनुभवाचे कागदपत्र शेवगाव नगर परिषद ता. शेवगाव यांचेकडे जमा केले होते. सदर कागदपत्रांची तपासणी करुन ते पात्र ठरल्याने त्यांचा आर्थीक तक्ता ओपन करण्यात आला. प्राप्त निवेदा पैकी आर्थीक तक्तामध्ये ते सर्वात कमी दराचे असलेने त्यांना दि 12/05/2023 रोजी निवेदा स्विकृती जा. क्र.730/23 दि.12/05/2023 नुसार पत्र देण्यात आले. त्यानुसार त्यांनी मुदतठेव पावती क्र. SBI, FDI 41966689133 दि.02/06/2023 रक्कम रुपये 1,56,60,000/- जंमा करुन करारनामा करुन दि 07/06/2023 रोजी जा.क्र. 899/2023 नुसार कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला.

परंतु पसुनिल मधुकर नागरगोजे प्रोपरायटर ईद्रायणी कन्स्ट्रक्शन संभाजीनगर यांनी जा. क्र. पापुयो / शेवगाव/15/2023 दि. 30/08/23 रोजी बँक हमी पत्र जमा करुन मुदत ठेव पावती प्रत मिळणेकरिता नगरपरिषद शेवगाव यांना पत्र दिले, सदर पत्रामध्ये बँक ऑफ बडोदा, नसौली गोपाल, हरदोई, उत्तरप्रदेश यांची बँक गॅरेंटी क्र. PBGFBB1501016310 बँक गॅरेंटी रक्कम रुपये 1,56,60,000/- ची दि. 21/08/2023 रोजीची बँक गॅरेंटी शेवगाव नगर परिषद ता. शेवगाव जि. अहमदनगर यांकडे जमा केली त्यानुसार, वरील बँक गॅरेंटी (हमीपत्र) नुसार त्यांना मुदत ठेव पावती परत करण्यात आली, तेव्हा बँक गॅरेंटी email id- nasaul@bankofbaroda.com यावर पडताळणीसाठी पाठविले.

NAREDRASINGH@bankofbarodaया मेल आयडीवरुन दि. 04/09/2023 रोजी सदरची बँक गॅरेंटी ही खरी असलेचे कळवले. परंतु बँक गॅरेंटीची रक्कम हि जास्त असल्याने शेवगाव नगर परिषद, शेवगाव ता. शेवगाव येथील पाणीपुरवठा अभियंता अतिरिक्त पदभार श्री. सचिन राजभोज यांना प्राधिकृत करुन बँक गॅरेंटीची मुळ प्रत क्र.- PBGFBB 1501016310 दि. 21/08/2023 रोजी सोबत घेवुन प्रत्यक्ष पंडताळणीसाठी बँक आँफ बडोदा, नसोलीगोपाल, हरदोई, उत्तरप्रदेश येथे दि. 20/05/2024 रोजी गेले असता सदर बँक अधिकारी अमरसिंग व नरेंद्रसिंग यांनी त्यांचे शाखेमार्फत सदर बँक गॅरेंटी हि ईद्रायणी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर सुनिल मधुकर नागरगोजे यांना दिली गेली नसल्याचे व सदर बँक गॅरेंटी हि खोटी व बनावट असल्याचे व उपरोक्त नमुद दोन्ही इमेल आयडी हे देखील बनावट असलेचे अमरसिंग व नरेंद्रसिंग व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा, नसोलीगोपाल, हरदोई, उत्तरप्रदेश यांनी लेखी कळविले.

तसेच नगर परिषद शेवगाव ता. शेवगाव मार्फत नगर परिषद किल्लेधारुर जि. बीड यांना पत्र जा. क्र. 50/2023 दि. 15/01/2024 रोजी कामाचा अनुभव प्रमाणपत्र सत्यता पडताळणी करिता पत्र दिले. मुख्याधिकारी किल्लेधारुर नगर परिषद यांनी जा. क्र. 7984/मसुजल / पापुयो/ 2024 दि. 13/02/2024 रोजी अन्वये नगर परिषद शेवगाव ता. शेवगाव येथे त्यांनी पत्र सादर केले की सदर अनुभव प्रमाणपत्र किल्ले धारुर नगर परिषदेच्या संचिकेत आढळुन आलेले नाही. तसेच सदरील प्रमाणपत्राची जावक नोंदवहीत नोंद केल्याचे आढळुन आली नाही. यावरुन आमची खात्री झाली की, सुनिल मधुकर नागरगोजे प्रोपरायटर ईद्रायणी कन्स्ट्रक्शन संभाजीनगर यांनी बँक गॅरेन्टीचे व अनुभव प्रमाणपत्राचे बनावट कागदपत्र बनवुन त्याचा वापर करुन शासनाची फसवणुक केली आहे म्हणुन माझी त्याचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.माझी वरील फिर्याद मी वाचुन पाहिली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर संगणकावर टंकलिखीत केलेली आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष श्री आशुतोष काळे यांनी सुरुवातीपासूनच इंद्रायणी कन्स्ट्रक्शन विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती तिला अखेर कालच्या धडक कारवाईमुळे यश प्राप्त झाल्याचे दिसत आहे असे दिसत आहे.

*ताजा कलम*

*शेवगाव नगरपरिषद च्या गेल्या सुमारे सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या कामाची प्रगती 5% सुद्धा काम पूर्ण झालं नाही त्यात नियुक्त कंपनीचा ठेकेदार भ**** निघाल्याने शेवगावकर यांचा जिव्हाळ्याचा आणि अति जिकिरीचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक यांनी बघायची भूमिका घेतल्याने मी शेवगावकर पाणी कृती समितीच्या प्रयत्नांना सुद्धा अपयश आले आणि अखेर त्या भामट्या इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालकावर शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या नवीन निविदा नवीन टेंडर नवीन ठेकेदार नवीन राजकारण आणि शेवगावकर यांची वर्षानु वर्षे पुन्हा पाण्याचे हाल*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने भव्य “तिरंगा यात्रा” चे आयोजन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- दिनांक …

वाघाने गोठ्यातील चार जनावरे केली ठार

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   मासळ परीसरातील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved