Breaking News

रेड क्रॉस संघटना सरसावली आसगाव वासियांच्या मदतीला

आरोग्य तपासणी, जनजागृती कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

भंडारा :- रेड क्रॉस सोसायटी भंडाराच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर पवनी आपत्कालीन परीस्थीतीत रेड क्रॉस संघटना जनसेवेसाठी सदैव तयार असते. त्यातच आसगाव वासियांवर आलेल्या महापुराच्या थैमानामुळे अस्खे गाव पुराच्या विळख्यान सापडल्यामुळे अतोनात हानी झाली. घरेच्या घरे पाण्याखाली आल्याने त्यातच घरातील धान्य सडल्याने दुर्गधी पसरायला सुरुवात झाली आहे. याची दखल घेवून रेड क्रॉस संघटना भंडाराच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले होते.

पुर परीस्थितीची भयानक परिस्थिती लक्षात घेवून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्स आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर, रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. चंद्र‌मोहन गुप्ता, सचिव डॉ. नितीन तुरस्कर, निलकंठ रणदिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आमगावात आलेच्या महापुराच्या परिस्थिमुळे जनतेच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन जिल्हयातील बहुतेक डॉक्टरांनी आरोग्य तपासणी शिबीरात उपस्थितीत राहुन रुग्ण सेवेचे महान कार्य केले आहे.अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस सुरु असल्याने काही नागरिकांनीच आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. परंतु आणखी दोन दिवसांनी शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी जननेची मागणी केली आहे.

आरोग्य शिबीरात प्रामुख्याने कार्यालय प्रमुख डॉ. जयंत गिऱ्हपुंजे, कोषाध्यक्ष हेमंत चंदवास्कर, कार्यकारी समिती सदस्य राजु खवस्कर, ग्रामपंचायत आसगावचे सरपंच निशिता कोरे, रक्तदुत प्रितम राजाभोज, डॉ. बावणकुळे, डॉ. लेपसे, स्त्रिरोग तज्ञ डॉ. स्नेहा तुरस्कर, डॉ. ठक्कर, डॉ. रूद्रसेन भजनकर, रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर, समीर नवाज, मिरा भट, योगतज्ञ रश्मी गुप्ता, आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम निखाडे, शिवाजी सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य लेपसे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. नितीन तुरस्कर यांनी उपस्थितांना शेती, गप्पी मासे विषयी मार्गदर्शन तसेच आशा वर्कर यांच्या कार्याची स्तुती केली. मात्र त्यांना आरोग्याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण आशा वर्कर ह्या आरोग्य सेविकांची विविध भुमिका पार पाडत असतात. तसेच उपस्थित मान्यवरांनी आहार, डेंग्यू आजार व निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत काय बदल करावा अशाप्रकारे विविध विषयांवर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
त्यावेळी आशा वर्कर, शिक्षिका व सदस्य यांना पल्स ऑक्सिमिटरचे वितरण केले. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डॉ. चंद्रमोहन गुप्ता यांनी रेड क्रॉस सोसायटीचे चेअरमन अशोक ब्राह्मणकर हे विदेशात असुनही त्यांनी आसगावच्या पुर परिस्थिती माहिती दिली. व योग्य ते सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. तर प्रास्ताविक डॉ. नितीन तुरस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सदस्य नवाज यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम भेदे, राजेश शरणागत, टिकाराम गडपायले, राहुल पटले, ज्योती मेश्राम, कमलेश मानकर, सुरज भगत, विमल टिपले, आसगावचे ग्राम पंचायत सदस्या शितल रामटेके, मंगला मेंढे, रेखा हत्तीमारे, अनिता मांडवकर, हिरा इलमकर, आरोग्य सेविका लोणारे, चव्हाण, आशा वर्कर वृंदा तिघरे, दर्शना बन्सोड, लता जुमळे, आशा कठाणे, दिक्षा दहिवले व रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, आपदा फाऊंडेशनचे सदस्य, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका इत्यादींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved