Breaking News

पॉस मशीन मुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण कारा

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अन्नपुरवठा मंत्रांना तहसीलदार मार्फत निवेदन

जिल्हा प्रतिनीधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

( भंडारा ) – लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पॉस मशीनमुळे निर्माण झालेल्या समस्या व त्यामुळे होणारी स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी दुर करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना होणारा वारंवार मनस्ताप दुर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार लाखांदूर यांनी मा. ना. छगनजी भुजबळ साहेब यांना तहसीलदार लाखांदूर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना सन 2017 पासून पॉस मशीन देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या मशीन‌द्वारे स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वितरण करीत आहे. परंतु वितरण करतेवेळी सर्वर प्रॉब्लेम व नेटवर्कच्या नियमित येणाऱ्या समस्यांमुळे स्वस्त धान्य दुकानदार व धान्य घेण्यास येणारे लाभार्थी यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत सापडलेला आहे व नाहक जनतेच्या रोसाचे कारण बनत आहे.

सर्वर डाऊन असल्यावर शिधापत्रिकाधारक वापस जातो आणि त्यामुळे गावात स्वस्त धान्य दुकानदाराबद्दल जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम केल्या जात आहे आणि दुकानदाराला बदनाम करण्याचे काम केले जात आहे.संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्वरचा व नेटवर्कचा प्रॉब्लेम दूर करून स्वस्त धान्य दुकानदारास वाटप करण्यास अडचणी येणार नाही.तसेच ज्या अति दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानात मोबाईल टावर देऊन नेटवर्कच्या समस्या दूर करून देण्यात याव्या,पॉस मशीनच्या समस्या दूर करून स्वस्त धान्य दुकानदारास कसलीही अडचन येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करून देन्यात यावी,अति दुर्गम भागातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्या, सर्वरमुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे धान्याचे वाटप होऊ शकत नसल्या प्रकरनी पुढील महिन्यात धन्याचे वाटप करण्याची मुभा देण्यात यावी,कॅरी फॉरवर्ड पद्धत सुरू करण्यात यावी,स्वस्त धान्य दुकानदारांना नियमित वेतन देण्यात यावा.

अशा मागणीचे निवेदन लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने मा. ना. छगनजी भुजबळ अन्न नागरी पुरवठा मंत्री यांना तहसिलदार लाखांदूर यांच्या मार्फत देण्यात आले आहे. निवेदन देतांना जयगोपाल लांडगे अध्यक्ष,सुधाकर ठाकरे,रोशन फुले,विलास हुमने,निखिल बागमारे, मोरू चूटे, प्रविण रामटेके, वसंत बंसोड, संदीप उईके, हेमंत बगमारे, प्रियांका चोपकर, माधुरी बोरकर, संदीप डोंगरावर,यसवांत शेंडे,मुखरू दुपारे,शैलेश चव्हाण,प्रविण बागमरे,दुर्योधन तुमंने,मीराबाई चौधरी,देविदास पारधी,भजन देशपांडे,अनिल बरडे, प्रमोद बगमारे, प्रज्वल बडोले,आनंदराव लांडगे,अमोल रामटेके इत्यादी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved