मुंढरी येथे आरोग्य तपासणी शिबिर, औषधी वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम साजरा
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा )- बदलती जीवनशैली व विविध खानपानामध्ये अनियमितता यामुळे आर्थरायटीसची समस्या दिवसेंदिवस निर्माण होत आहे. याकरिता वेळीच औषधोपचार करावा. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. याकरिता जीवनशैली बदलविणे गरजेचे आहे. सांध्यांना आलेली सुज म्हणजे आर्थराइटिस. हा आजार वयानुसार वाढत जात असतो. वाढते वय, लठ्ठपणा, खानपानाकडे दुर्लक्ष, व्हिटॅमिन डी घटकांची कमतरता यामुळे आजार वाढत असतो. परंतु यावर मात करण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्वाचे आहे. त्याचा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे कोवळ्या सुर्यप्रकाशात बसणे. संतुलित आहार घेणे व नियमित योगासन करणे तसेच नेहमी आयुर्वेदीक औषधांचा वापर करावे. तसेच कॅन्सरचे विविध प्रकार आणि त्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे कारण आयुर्वेदीक औषध ही सुखी आरोग्याची गुरूकिल्ली आहे असे प्रतिपादन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य तथा योग शिक्षक विलास केजरकर यांनी केले.
ते जिल्हा परिषद आरोग्य विभाग, राष्ट्रीय आयुष विभागातंर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर व उपआरोग्य केंद्र मुंढरी (बुज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक दवाखाना मुंढरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, औषधी वितरण व वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुंढरी येथील ग्राम पंचायत सरपंच पुजा वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आयुष्मान आरोग्य मंदिर मुंढरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बोंबार्डे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयुष विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नविनकुमार डेकाटे, नेत्र तंत्रज्ञ पी. यु. कांबळे, उपआरोग्य केंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. भुषण फेंडर, मार्गदर्शक म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य तथा योग शिक्षक विलास केजरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करण्यात आले.
दैनंदिन जीवनात योग-प्राणायाम करणे आवश्यक आहे. स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने विशेष टिप्स तसेच आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामासह सकस आहाराची आवश्यकता आहे. असे मत आयुष्मान आरोग्य मंदिर मुंढरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बोंबार्डे यांनी व्यक्त केले. योग प्राणायाम सतत केल्याने व आहारात फळे व हिरव्या भाजीपाला घेतल्यास डोळ्याचे आजार बरे होतात असे मत आयुष विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नविनकुमार डेकाटे यांनी व्यक्त केले. तसेच मानव व वृक्षांचा अतुट संबंध आहे. मानवाला जिवंत राहण्यासाठी मिळेल त्याठिकाणी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुंढरी येथील ग्राम पंचायत सरपंच पुजा वासनिक केले. व उपस्थितांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
आरोग्य तपासणी शिबिरात औषधी वितरणाचा बोरगाव, मुंढरी (बुज), मुंढरी ( खुर्द) या परिसरातील १०० च्यावर महिला व पुरूषांनी लाभ घेतला आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका एम. टी. हुमणे, आरोग्य परिचर राजेश तायवाडे, आशा वर्कर, शकुंतला ढेंगे, सिमा निमजे, ममता गजभिये, अनिता पिंगळे, सिमा देवगडे, रुग्ण व गावकऱ्यांनी सहकार्य केले.