Breaking News

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक स्तनपान सप्ताह – वंदना बरडे अधीसेवीका

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

वरोरा :- राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम व केअर कंपॅनियन प्रोग्रॅम अंतर्गत दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शून्य मातामृत्यू व बालमृत्यू’ या संकल्पनेतून सर्व आरोग्य संस्थेत ‘स्तनपान जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

“आई आणि बाळा मधील अंतर कमी करुया स्तनपानाला समर्थ देऊ या”

वरील विषयास अनुसरून उप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डॉ. प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ .अश्विनी गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ, वंदना विनोद बरडे अधीसेवीका व गितांजली ढोक आहारतज्ञ उपस्थित होते.रितसर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यात त्यांनी जागतिक स्तनपानाचे काय महत्त्व आहे हे हिरकणी च्या कथेद्वारे समजून सांगितले.स्तनपान करने खूप पुण्याचे कामं आहे.स्तनपान केल्यामुळे आईचा बर्याच रोगापासून बचाव होतो.एक सत्कर्म केल्याचं समाधान मीळते.तसेच आपणास विनंती करण्यात येत आहे कि आपण आपल्या बाळाला प्रत्येक वेळी स्तनपान त्यांच्या मागणीप्रमाणे करावे.

रुग्णालयामध्ये पुढील ७ दिवसांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्तनपान सप्ताह मध्ये वेगवेगळ्या थीम अनुसार केअर कंपॅनियन प्रोग्रॅम अंतर्गत वापरले जाणारे साधने (फ्लीप-चार्ट, थाळी, डॉल, ब्रेस्ट मॉडेल, टेकवे) यांच्या मदतीने सत्रे आयोजित करून जास्तीत जास्त महिलांना स्तनपानाचे महत्व समजावून सांगण्यात येणार आहे.डाॅ अश्वीनी गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी स्तनपानाविषयी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी आई आणि बाळाच्या स्तनपानाबद्दल आरोग्याची माहिती दिली.गितांजली ढोक यांनी आहाराबाबत मार्गदर्शन केले.मीना मोगरे अप.यांनी दुध पाजण्याच्या पध्दतीचे प्रात्याक्षीक करून दाखविले.रुबिना खान अप.यांनी सुत्र संचालन केले.व आभारप्रदर्शन प्रणाली गेडाम अप.यांनी केले. कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे अधीसेवीका, रूबिना खान,सुनंदा पुसनाके पसे,सरस्वती कापटे पसे.कल्यानी कस्तुरे,मीना मोगरे अप.कूंदा मडावी यांनी मेहनत घेतली व सर्व अधिकारी व कर्मचारी मीळून स्तनपान सप्ताहाचा उद्घाटनाचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.एकुन ५० मातांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved