Breaking News

लोकहो,वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा – राहुल डोंगरे

टेमनी येथे सिहोरा पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

भंडारा :- जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत यासाठी सरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष ,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,ग्रामसेवक,पटवारी यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.संबधित गावात ही मंडळी अप्रतिम असे समुपदेशन करून गावकऱ्यांच्या डोक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करू शकतात.तर सहजतेने अंधश्रध्देचे निर्मूलन करता येईल.त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासा व घटनेची चिकित्सा करा असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर तालुका संघटक , प्रसिद्ध वक्ते प्रा.राहुल डोंगरे यांनी केले.

सिहोरा पोलीस ठाणेच्या वतीने ‘ टेमणी ‘ येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार – प्रसार समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच घनश्याम कुंभरे होते. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार नितीन मदनकर,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तुमसर तालुका सहसचिव किशोर बोंद्रे उपस्थित होते.

राहुल डोंगरे म्हणाले ,शकुन व नवस,गंडेदोरे,ताईत,ग्रहांचे खडे,मंत्र तंत्र यांना सत्याचा आधार नाही. जोतीष्य, हस्तरेखाशास्त्र विज्ञान नाही. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे.त्याचे निर्मूलन कसे करता येईल याकरिता प्रा.राहुल डोंगरे यांनी वैज्ञानिक प्रयोगातून अग्नी प्रज्वलित केले.कानाने चिट्टीवरील नावे वाचून दाखविले.जळते कापूर भक्षण करून दाखवले.निंबुतून केस काढून दाखविले. पेचकस द्वारे तांदुळ भरलेला तांबे वर उचलून दाखविले.वैज्ञानिक प्रयोगातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.जादुटोना विरोधी कायदा सुद्धा प्रा.राहुल डोंगरे यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितला.भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक लोहित मतानी,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे,आय.पी. एस . रश्मिता राव तुमसर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी या उपक्रमाला चालना दिल्यामुळे अनेकांचे गैरसमज दूर होतील व कुणीही भोंदू बाबांना बळी पडणार नाही व गावा – गावात शांतता प्रस्थापित होईल व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होवून आदर्श पिढी तयार होईल असे अपेक्षित आहे.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद सहारे ,पोलीस पाटील संदीप भगत,ग्रामपंचायत सदस्य सुनिल पटले, शिशुपाल भगत,पोलीस हवालदार राजू साठवणे ,पोलीस कॉनस्टेबल संतोष शिदने आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन किशोर बोंद्रे यांनी केले.तर आभाप्रदर्शन ठाणेदार नितीन मदनकर यांनी मानले. पोलीस जिल्हा पोलीस विभागातर्फे राबवित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन ” प्रचार व प्रसार” कार्यक्रमाची नागरिकांकडून स्तुती केली जात आहे. हे विशेष!

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved