Breaking News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चिमूर विधानसभा क्षेत्र समितीच्या अध्यक्ष पदी आमदार बंटी भांगडिया यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता विधानसभा क्षेत्र समिती स्थापन

समीतीचे सदस्य म्हणून किशोर मुंगले व सचिन आकुलवार यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी त्याच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेची सुरवात केली.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशाने व शासनाच्या निर्णयानुसार चिमूर विधानसभा क्षेत्र समिती स्थापना करण्यात आलेली आहे.

या समितीचे अध्यक्ष विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया हे आहेत. तर सदस्यपदी सचिन आकुलवार, किशोर मुंगले, तहसीलदार,गट विकास अधिकारी,बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच श्रीमती पूनम गेडाम बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत नागभीड भाजपा जनसंपर्क कार्यालयात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात व सचिन आकुलवार माजी बांधकाम सभापती यांच्या नेतृत्वात आतापर्यंत 2250 महिलांची मोफत ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved