Breaking News

नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे शिक्षक व पालक सभा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक ०३/०८/२०२४ रोज शनिवारला नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे सन २०२४-२५ ची पालक व शिक्षक सभा व माता पालक सभा आज दुपारी १२.०० वाजता कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली, यावेळी सभेचे विषय पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणीची निवड करणे, पालक शिक्षक संघ स्थापन करण्याच्या उद्देश स्पष्ट करणे, शाळेतील विविध उपक्रमाची माहिती देणे, शिष्यवृत्ती सारख्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे, पालकांच्या सूचनांचे संकलन करणे, अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषयावर चर्चा करण्यात आली.

पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष गणेश गावंडे, सचिव गाडवे सर,सहसचिव पदी सौ. आरती स्वान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरकर सर यांनी केले आभार प्रदर्शन श्रीराम सर यांनी केले असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष-निशिकांत मेहरकुरे, ने.वि.प्राचार्य, अतिथी – मिलमिले सर पर्यवेक्षक, श्रीमती उमरे मॅडम पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षीका व पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved