Breaking News

भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमूर शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून विविध गावातील महिलांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर शहरात स्वर्गीय गोटुलालजी भांगडिया व स्वर्गीय धापुदेवी भांगडिया स्मृती प्रित्यर्थ भांगडिया फाउंडेशनच्या वतीने दिनांक 31/08/2024 रोज शनिवार ला वेळ दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास नेहरू विद्यालयाचे भव्य पटांगणात भव्य दहीहंडी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजित केले आहे. या दहीहंडी स्पर्धा कार्यक्रमाचे प्रथम बक्षिस 61,000 रुपये तर द्वितीय बक्षिस 31,000 रुपये असून दहीहंडी स्पर्धेत भाग घेण्यासाठी सचिन डाहुले 8788420014, गुणवंत चटपकार, गोलू मलोदे 9834323562, 7588883223, शुभम सातपुते 9665479704 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

 “वंचित बहुजन महिला आघाडीच्या माजी तालुका अध्यक्षा सहित विविध गावातील महिलांचा भाजपात प्रवेश”

“आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास”

चिमूर तालुक्यांतील आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून चिमूर तालुक्यांतील विविध गावातील महिलांचा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या नविन वाड्यात भाजपाचा दुपट्टा टाकून प्रवेश केला.वंचीत बहुजन आघाडीच्या माजी तालुका अध्यक्ष बबिता रमेश गेडाम, अंजली देवराव मेश्रान जांभूळघाट, कुसूम सुदर्शन सातपुते महीला मंडळ अध्यक्ष, ममता अनिल मेश्राम मेटेपार, सोनाबाई दिगांबर लांडे आंबेनेरी, बेबी भाऊजी टेकाम कोटगाव, शेवंता प्राण खापर्डे कोटगाव, शालू जगदीश झाडे, सविता नागोराव शिवरकर चिमूर, या महिलांनी आज भाजपाचा प्रवेश केला.

 

यावेळी भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस मनीष तुम्पल्लीवर, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, एकनाथ थुटे, घनःश्याम डुकरे,भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई नन्नावरे, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गीताताई लिंगायत,माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाकडे,संजय नवघडे, भाजपा महिला आघाडी तालुका महामंत्री आशा मेश्राम,पराग अंबादे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved