स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिमूर तालुक्यांतील अंगणवाडी कर्मचारी व बचत गट प्रतिनिधी यांचा स्नेहमिलनसोहळा तसेच पत्रकारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन हुतात्मा स्मारक चिमूर येथे दि. २० ऑक्टोंबर २०२४ ला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्व. इकलाखभाई कुरेशी हे समाजवादी पक्षाचे नेते होते. तसेच गोरगरिबांचे कैवारी म्हणुन चिमूर तालुक्यात प्रसिद्ध असुन, गोर गरीबांचे कैवारी म्हणुनच त्यांना सर्वत्र ओळखले जात होते. त्यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त तालुक्यांतील अंगणवाडी कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी यांचा स्नेहमिलन सोहळा तसेच पत्रकारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमांचे अध्यक्ष किसनाताई भानारकर,माजी अध्यक्षा जिल्हा परिषद भंडारा तथा कार्याध्यक्षा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र, कार्यक्रमांचे उद्घाटक चिमूरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संध्या पवार सामाजिक कार्यकर्ते नागपुर,सरोज साहारे,सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर,शरद पारखी बालविकास प्रकल्प अधिकारी वरोरा,सुरेश राठोड बालविकास प्रकल्प अधिकारी ब्रम्हपूरी, प्रमोद जोनमवार बालविकास प्रकल्प अधिकारी सिंदेवाही,जहांगीर कुरेशी माजी सरपंच,ग्राम पंचायत नागभिड,शकील शेख सामाजिक कार्यकर्ते तळोधी नाईक,इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व बचत गट प्रतिनिधी, सदस्य,अंगणवाडी कर्मचारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे.असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान कुरेशी यांनी केले आहे.