Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

चंद्रशेखर बावनकुळे यांचा संक्षिप्त परिचय

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर :- भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी – मौदा विधानसभा चे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली, भारतीय जनता पार्टीचा सदस्य ते भाजपा प्रदेशाध्यक्ष असा ३० वर्षांचा राजकीय प्रवास असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया.

• भाजपाच्या जिल्हा ते प्रदेश या संघटनात्मक पातळीवरील सर्वच पदांचा अनुभव.
• नोव्हेंबर २०२४ – कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य.
• जानेवारी २०२२ – विधान परिषद सदस्य (नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था)
• २००४-२००९, २००९ – २०१४ , २०१४ -२०१९ विधानसभा सदस्य (आमदार) (विधीमंडळ पंचायत राज, सार्वजनिक उपक्रम व ग्रंथालय समिती सदस्य)
• २०१४ – २०१९ – मंत्री- उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, मंत्री- राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नागपूर जिल्हा
——-
* १९९७ २००२ – जिल्हा परिषद सदस्य, नागपूर जिल्हा परिषद
* २००२ – २००४ – जिल्हा परिषद गटनेता : भाजपा * शिवसेना तथा सदस्य आरोग्य व बांधकाम समिती
भारतीय जनता पार्टी
* १९९५ – पासून भारतीय जनता पक्षाचे सक्रीय सदस्य
* १९९५ – राज्य गाव जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा
* १९९९ २००१ – नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे महामंत्री
* २००२ – संघटन प्रमुख भारतीय जनता पक्ष कामठी क्षेत्र
* २०११ ते २०१४ जिल्हाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा
* २०१४ ते २०१७ प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
* २०२१ ते २०२२ सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
(महाराष्ट्रातील १६ लोकसभा क्षेत्र प्रवास कार्यक्रम प्रभारी)
* १२ ऑगस्ट २०२२ पासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती

इतर सामाजिक कार्य :
* १९८८-१९९५ छत्रपती सेना विद्यार्थी संघटनेत कार्य
* १९९०- १९९५ अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समिती संस्थापक अध्यक्ष
* कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी व पुनर्वसनासाठी सातत्याने लढा व आंदोलने
* वीज प्रकल्पग्रस्त आंदोलनात अटक
* अध्यक्ष, श्री जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान कोराडी
* अध्यक्ष, महालक्ष्मी जगदंबा बिगर शेती सहकारी संस्था, नांदा कोराडी
* अध्यक्ष, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी श्री क्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार

* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा …

सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved