Breaking News

झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय

‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती

विशेष प्रतिनिधी – मुंबई

मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!’झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या’आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे,शिवराज वायचळने.सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर,पर्ण पेठे,प्रवीणकुमार डाळिंबकर,प्राजक्ता हनमघर,किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे.
पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय ‘झी स्टुडिओज’ही संस्था पुढे आली असून त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी,धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत,या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.

तसेच “श्रीकांत” फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत.आज सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचा मुंबई महानगर पालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी, मुंबई महानगर महापालिका उपायुक्त एन डी गोवानी, झी स्टुडिओजचे चिफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर, निर्माते निधी परमार – हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या खास मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहुर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार

* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा …

सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved