
शेगाव : परिसरातील येउलखेड शिवारात पेरणी नंतर विसदिवसापासून पाऊस नसल्याने पिके सुकली,त्यामुळे शेतकर्यानी शंभर एकरावरील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला.
परिसरात जुनच्या सुरूवातीला पुरेशा पाऊस झाल्याने शेतकर्यानी पेरणी केली.त्यात सोयाबिनचा पेरा सर्वाधिक असून पिके जमिनीचेवर यायला सुरूवात झाली.पण गत विसदिवसासून या पिकावर पाऊसच नसल्याने शेतातील अर्धे पिक कोमजून नष्ट झाले.तर तुरळक पिक उभे दिसत होते परंतु पावसाअभावी तेही सुकत असल्याने अखेर शेतकर्याना तेही पिक ट्रॅक्टर द्वारे मोडून टाकावे लागले. येउलखेड येथील
सदानंद पुंडकर 28एकर, श्रीधर पुंडकर 35एकर, मोहन पाटील 8एकर , अरून मेटागे, शीवशकर पुंडकर,शनिवारी पुंडकर व ग़ावतील अनेक छोटे मोठे शेतकर्यानी जवळपास शंभर एकरावरील सोयाबीन पिक मोडले.आता त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. आधीच सततच्या नापिकीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यानी कशीतरी पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली.आता दुबार पेरणी साठी कुठून पैसे आणावे? हा प्रश्न पडला आहे.
तरी कृषी विभागाने तात्काळ सर्वे करून शेतकर्याना दुबार पेरणी साठीबियाणे खते व अनुदान देण्याची मागणी होत आहे.
पेरणी नंतर पावसाने दीड मारल्याने परिसरातील जवळपास शंभर एकरावरील सोयाबीन पिके ट्रॅक्टर द्वारे मोडून टाकण्यात आले आहे. आता दुबार पेरणी साठी कुठून पैसे आणावे, हा प्रश्न सतावत आहे. कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामे होवून मदतीची अपेक्षा आहे.
– शिवशंकर पुंडकर