
लाखनवडा बॅंक शाखे वर भाजपा चे आंदोलन
सचिन बोहरपी
बोरीअडगाव (खामगाव)भाजपा चे तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे अध्यक्षतेखाली भारतीय स्टेट बॅक शाखा लाखनवाडा येथे आंदोलन करण्यात आले. बॅकेत सुरू असलेली दलाली पद्धत विरोधात जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. असभ्य वर्तन करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांचे विरोधात सुद्धा जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. प्रलंबित कर्ज प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी शाखा अधिकारी सारंग ठाकरे यांनी दिले. यावेळी बँकेच्या बाहेर प्रत्यक्ष जनते समोर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी सकारात्मक पणे शक्य तेवढे लवकरच समस्या निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा बँकेला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी अंबादास उंबरकार, पंचायत समिती सदस्य रामेश्वरजी बंड, किसान आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुभाष सावळे, भाजपा सोशल मिडीया तालुका सहसंयोजक सोशल अनंता शेळके, प्रकाश बारगळ, सदाशिव राऊत, सिताराम इंगळे, डॉ तौसीफ शेख, सुनिलजी वाढे, रमेशजी इंगळे, गजानन कराळे, कैलास कवळकार व असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.