
रामटेक :- रामटेक लोकसभा क्षेत्रातील शिवसेना खासदार श्री कृपाल तुमाने यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी “स्टार प्रचारक” म्हणून निवड करण्यात आली. बिहारमध्ये शिवसेनेचा प्रचार करणारे ते विदर्भातील एकमेव शिवसेना नेते आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार असून शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्यासह २० शिवसेना नेते प्रचार करणार आहेत.