Breaking News

राष्टीय महामार्गाच्या काही अंतरावर अस्वल मृत अवस्थेत आढळली

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमुर :- चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या खडसंगी क्षेत्रात, खडसंगी गावापासून १ कि.मी. अंतरावर चिमूर- वरोरा राष्टीय महामार्गाच्या काही अंतरावर बुधवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही नागरिकांना अस्वल मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती वनविभागाला नागरिकांनी कळविली. काही वेळातच क्षेत्र सहायक यु.डी. घुघरे वनकर्मचाऱ्याच्या ताफ्यासह घटणास्थळवर दाखल झाले. मृत अस्वलाची पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला.

मृत अस्वलाचे वय सुमारे दोन वर्षे असून वाहणाच्या धडकेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवित अंतिम अवहालसाठी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती खडसंगी क्षेत्राचे क्षेत्रसहायक यु. डी. घुघरे यांनी सांगितले या वेळी क्षेत्रसहायक इ.एल. नन्नावरे,वनरक्षक कु.आर.के.ढोके, मनोज उरडोड, विनोद औचार, वनमजुर रमेश नागोसे,वसंत मिसार उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved