Breaking News

राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या वतीने शासनाला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूरच्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर दि. ८ ऑक्टोबरला थाळी वाजवा आंदोलन करीत आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्वीकारले तसेच उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून जातिनिहाय करण्यात यावी, मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध नसून ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणातून देण्यात येऊ नये, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, महाज्योती संस्थेस एक हजार कोटीचे अनुदान देण्यात यावे ओबीसी समाजाचा रिक्त अनुशेष पूर्ण भरण्यात यावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण लागू करण्यात यावे राज्यातील सर्व जिल्ह्यात ओबीसी कार्यालय सुरू करण्यात यावे एससी एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर योजना लागू करण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात नमूद होत्या.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समनव्यक डॉ अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने हुतात्मा स्मारक चिमूर येथून थाळी वाजवा आंदोलनास सुरुवात होऊन मुख्य मार्गाने येत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्वीकारले.तसेच एसडीओ यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले, यावेळी ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved