Breaking News

मास्क न लावणा-या २३७ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १०७८४ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर, ता.८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवार (८ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०७८४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३७,५१,०००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४२, धरमपेठ झोन अंतर्गत ४५, हनुमाननगर झोन अंतर्गत २९, धंतोली झोन अंतर्गत १४, नेहरुनगर झोन अंतर्गत १२, गांधीबाग झोन अंतर्गत १६, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १८, लकडगंज झोन अंतर्गत १२, आशीनगर झोन अंतर्गत २३, मंगळवारी झोन अंतर्गत २० आणि मनपा मुख्यालयात ६ जणांविरुध्द गुरुवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ५३१४ बेजबाबदार नागरिकांकडून रु २६ लक्ष ५७ हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.

आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १५१८, धरमपेठ झोन अंतर्गत १९६७, हनुमाननगर झोन अंतर्गत १००६, धंतोली झोन अंतर्गत १०१८, नेहरुनगर झोन अंतर्गत ६०१, गांधीबाग झोन अंतर्गत ७०४, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ७३९, लकडगंज झोन अंतर्गत ६४२, आशीनगर झोन अंतर्गत ११६३, मंगळवारी झोन अंतर्गत १३३३ आणि मनपा मुख्यालयात ९३ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया …

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिक्षाभूमीला भेट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन प्रतिनिधी नागपूर  नागपूर, दि १८. : केंद्रीय गृह व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved