- जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसील मध्ये दिनांक. १८/१०/२०२० रोजी खडसंगी (बफर) परिक्षेत्रा अंतर्गत के. डब्लु. धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर), खडसंगी, एस. आर.a औतकर, क्षेत्र सहाय्यक, खडसंगी व एम. आय. बोरकर, वनरक्षक , खडसंगी-II हे नियत क्षेत्र खडसंगी-I मध्ये गस्त करुन सकाळी ०५:०० वाजता परत येत असतांना कक्ष क्र.१५ प्रादेशिक वरोरा चिमूर रोड, खडसंगी मध्ये अवैध्यरित्या रेती उत्खनन करुन वाहतुक करतांना एक ट्रॅक्टर वनकर्मचाऱ्यांना आढळले.
वनकर्मचाऱ्यांनी शिताफिने ट्रॅक्टर ताब्यात घेतले महिद्रा 475 DI कंपनीचे ट्रॅक्टर चेचीस. NJNWL478 , इंजिन क्र. 006505439C1, ट्रॉली चेचीस क्रमांक. TI/14/1202/47 ताब्यात घेडुन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणुन जमा केले. सदर घटनास्थळ या विभागाच्या हद्दीबाहेर असल्यामुळे प्रकरण महसुल विभागाकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
सदर ची कार्यवाही गुरुप्रसाद , उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर तसेच ए. जी. जाधव , सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-१) , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली के. डब्लू, धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर), खडसंगी यांनी केली.तर दिनांक.१९/१०/२०२० ला चिमूर तहसील येथे ट्रॅक्टर देण्यात आले. यामुळे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.