Breaking News

अवैधरित्या जंगलात भ्रमंती घडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांमध्ये परवानगी नसतांना सुध्दा पर्यटकांना अगाऊ व जास्तीची रक्कम घेऊन अवैधरित्या जंगलात भ्रमंती घडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ताडोबा येथील व्यवस्थापकाला यश मिळाले आहे. खुद्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सापळा रचून अशा गैरप्रकाराचा भांडाफोड केलेला आहे.

ताडोबामधे सुरू असलेल्या अशा गोरखधंदयाची तक्रार चिमूर पोलिसांत नोंदविण्यात आली. चिमूर पोलिसांनी वनरक्षक टेकचंद सोनुले व खडसंगी येथील दलाल सचिन कोयचाडे याला ताब्यात घेतले असून मंगळवारच्या रात्री त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी वनरक्षक सोनुले यांच्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश शेंडे यांनी व्यक्त केलेली आहे. या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved