विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:- गेल्या चार वर्षांपासून शेवगाव तालुक्यामध्ये शेअर मार्केटच्या
नावाने गुंतवणुकीचे जवळपास लहान-मोठे 200 ते 250 तथाकथित ऑफिस उघडले दरमहा 8 ते 16 % पर्यंत परताव्याची आमिष दाखवून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी गुंतवणुकी केल्या. बऱ्याच काळ हे सुरळीत चालले ही देखील पण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून यातील बऱ्याच ऑफिस वाल्यांनी परतवा देणे थांबवले आणि थोड्याच कालावधीत ते कुटुंबासह फरार होऊ लागले. आज घडीला शेवगाव तालुक्यामध्ये एकही शेअर मार्केट गुंतवणूक ऑफिस वाला नाही. प्रत्येक आरोपी हा लोकांचे करोडो रुपयांच्या रकमा घेऊन फरार आहेत त्यांच्याशी कोणत्याच प्रकारचा संपर्क होत नाही.
50 लाखांपासून ते अंदाजे 500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अशा रकमे बुडवून ही सगळी मंडळी फरार आहे. एक ढोबळ अंदाज बांधला तरी हा सगळा प्रकार दोन ते तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते. सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे की यावर प्रशासनाने इतके दिवस पूर्णपणे दुर्लक्ष केले व आज घडीला फसवणूक झालेल्या नागरिकांना आम्ही पोलिसांकडे रीतसर तक्रार अर्ज देऊन गुन्हे दाखल करा असे मार्गदर्शन केले व कायदेशीर पाठपुरावा करूनएकावर गुन्हा नोंदवला ही व त्यातील एक आरोपी आज गजाआड आहे. परंतु घटनेचे गांभीर्य बघता तालुक्यामध्ये पाच ते दहा हजार कुटुंब या फसवणुकीला बळी पडली असून नवीन तक्रार अर्ज आज घडीला शेवगाव पोलीस स्टेशन स्वीकारत सुद्धा नाही शेकडो अर्ज प्राप्त असूनही इतर कोणत्याही आरोपींवर गुन्हा दाखल केला जात नाही. फसवणूक झालेल्या नागरिकांची फक्त ससे होळपट होतीये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह शेवगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे.
तरी आपणास सर्व फसवणूक झालेल्या शेवगाव च्या जनतेच्या वतीने व एक कायद्याचे अधिकारी, शेवगाव चे भूमिपुत्र, वकील म्हणून समाजाप्रती असलेलं दायित्व म्हणून एवढीच विनंती आहे की आपण या शेवगाव तालुक्याच्या जनतेच्या न्याय हक्कासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवावा. या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालावे व या घोटाळ्याची Enforcement Directorate (ED) शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करून पळून गेलेल्या आरोपींवर व सबंध प्रकरणावर E. D. / E. O. W. / M. P. I. D. द्वारे चौकशीची मागणी शेवगांव बार कौन्सिल सोशिएशन चे सदस्य ॲड. आकाश दिनेश लव्हाट ॲड. सुहास चव्हाण ॲड. अतुल लबडे यांनी nibes.
*ताजा कलम*
*शेवगाव तालुक्यातील घोर फसवणूक झालेल्या हजारो लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी लोकनियुक्त खासदार श्री निलेश लंके साहेब यांनी लवकरच आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यासंबंधात चर्चा करून फरार आरोपींवर खडक कायदेशीर कारवाई करावी यासाठी पुढील आठवड्यामध्ये पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी निवेदन देणाऱ्यांना आश्वासन दिले*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*