पंचायत समिती चिमूर येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-मिलींद मधुकर वाढई, वय २७ वर्षे, नौकरी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, (कंत्राटी) पंचायत समीती कार्यालय चिमूर ता. चिमूर, जि. चंद्रपूर व आशिष कुशाब पेंदाम वय २८ वर्षे, धंदा- मिस्त्रीकाम रा.देवरी, ता. चिमूर जि. चंद्रपूर (खाजगी ईसम) यांना लाचेच्या सापळ्यात रंगेहात अटक केली.
तक्रारकर्ता हे मौजा कळमगाव, पोस्ट जामगांव कोमटी ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन रोजमजुरीचे काम करतात. तक्रारकर्ता यांचे नावे शंबरी आवास योजनेअंतर्गत सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजुर झाले होते. सदर घरकुल बांधकामाकरीता तक्रारकर्ता यास चार टप्प्यांत बांधकामानुसार रक्कम जमा होणार होती, तक्रारकर्ता यास घरकुल योजनेने दोन किस्त ६५,०००/- रु.जमा झाले असून तिसरा टप्पा ४५,०००/-रुपये व चौथ्या टप्याने २०,०००/- रूपये असे एकूण जमा करून देण्याकरिता गैरअर्जदार मिलींद मधुकर वाढई, वय २७ वर्षे, व्यवसाय नौकरी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, (कंत्राटी) पंचायत समीती कार्यालय चिमूर यानी तक्रारदारास २०,०००/- रूपये ची मागणी केल्याचे तक्रार ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे प्राप्त झाली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक १९/०६/२०२४ रोजी केलेल्या पळताळणी कार्यवाही मध्ये गैरअर्जदार मिलिंद मधुकर वाढई यांनी तक्रारदार यास लाच मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रू. स्विकारण्याने मान्य केल्याचे दिसून आले तसेच पडताळणी कार्यवाही दरम्यान गैरअर्जदार मिलीद मधुकर वाकई यांच्या सोबत असलेले त्याचे मित्र नामे आशिष कुशाब पेंदाम याने गैरअर्जदार मिलींद वाढई यास लाच रक्कम देण्याकरिता तक्रारदारास प्रोत्साहित केले. सापळा कार्यवाहीदरम्यान गैरअर्जदार मिलींद मधुकर वाढई वय २७ वर्षे, नौकरी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, (कंत्राटी) पंचायत समीती कार्यालय चिमूर ता. चिमूर जि. चंद्रपूर यांनी स्वतः लाचरक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून गैरअर्जदार मिलींद मधुकर वाढई याचे मित्र आशिष कुशाब पेंदाम यांना ताब्यात घेवून पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. जितेंद्र गुरनुले, पोहवा संदेश वाघमारे, पो.अ. वैभव गाडगे, राकेश जांभुळकर व चालक पो.अं. सतिश सिडाम ला.प्र.वि. चंद्रपछर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुबपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राहुल माकणीकर, पोलीस अधिक्षक सा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर
संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक सा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय नागपूर
LANDLINE NO 0712-2561520
TOLL NO 1064
Website www.acbmaharashtra gov in
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय चंद्रपूर फोन क. 07172-250251 श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर मो.न. 9322253372
जितेन्द्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर मो.न. 8888857184