Breaking News

आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

हिंगणघाट पोलिसांनी दिली सायबर गुन्हेगारी बाबत माहिती

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

वर्धा:-दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस असल्याने आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे कार्यक्रमा आयोजित करून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार मनोज गभने यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे… पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने… हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण वस्तीगृह अधीक्षक प्रियंका वेताळ मॅडम यांनी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले…. पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे , व पोलीस हवालदार नरेंद्र डहाके यांनी विद्यार्थ्यांना एक जुलै पासून सुरू झालेले नवीन कायदे भारतीय न्याय संहिता  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याबाबत माहिती माहिती दिली. तर पोलीस हवालदार प्रवीण बोधाने यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कशा पद्धतीने घडतात  व सायबर गुन्हेगारांपासून कशा पद्धतीने वाचायचे याबाबत मार्गदर्शन केले.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोबिनी गेडाम या विद्यार्थिनीने केले.. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनश्री धुर्वे हिने केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved