Breaking News

धानोरा शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने शिक्षणाधिकारी(प्राथ) प्रकाश मिश्रा यांचा पुष्पगुच्छ देऊन आभार

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

राळेगाव :- राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा धानोरा येथे गेल्या अनेक वर्षापासून गणित विज्ञान विषयाचे शिक्षकपद हे रिक्त होते.व या सत्रात दोन शिक्षकाची बदली झाल्यामुळे शाळेचा संपूर्ण कार्यभार केवळ चार शिक्षकावरच सुरू होता. वर्ग 1 ते 8 आणि कार्यरत शिक्षक केवळ चार.विद्यार्थी संख्येच्या मानाने शिक्षकांची 3 पदे रिक्त होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती धानोरा च्या वतीने सतत शिक्षक मिळविण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला.

या सततच्या पाठपुराव्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी धानोरा शाळेला एक गणित विज्ञान विषय शिक्षक पवित्र पोर्टल मधून दिला. व एक शिक्षक पुन्हा धानोरा शाळेला देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे धानोरा गावात आनंदाचे वातावरण आहे.धानोरा शाळेला शिक्षक दिल्याबद्दल धानोरा शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved