जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
राळेगाव:-दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या सातव्या स्मृतिदिना प्रित्यर्थ भव्य मोफत रोगनिदान उपचार व रक्तदान शिबिर आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोज सोमवारला सोनामाता हायस्कूल चहांद येथे संपन्न झाले.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटिंग हे दरवर्षी स्वर्गीय मोहित याच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक जाणिवेतून सेवाभावी उपक्रम राबवित असतात. स्वर्गीय मोहित झोटिंग याचे सात वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. आपल्या एकुलत्या एका मुलाचे देहदान करण्याचा निर्णय घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह सुपूर्द केला होता हे विशेष. या आरोग्य शिबिराला उद्घाटक म्हणून राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव उईके हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जी प सदस्य चित्तरंजन दादा कोल्हे यांनी भुषविले. या कार्यक्रमाला बालरोग तज्ञ जयश्रीताई कांबळे, शिबिर प्रमुख मुरलीधर उमाटे, चहांद च्या सरपंच रूपालीताई राऊत, संजयजी काकडे, डॉ.कुणाल भोयर, निखिल शेळके, राहुल पाटील, तसेच सोनामाता हायस्कूल चे मुख्याध्यापक अनिल धोबे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरानी स्वर्गीय मोहितच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णांचे निदान व उपचार करण्यात आले. यावेळी अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पंकज टापरे यांनी केले. संचालन सतिश सावंत यांनी केले तर आभार शितल गावंडे यांनी मानले सदर रोगनिदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी सोनामाता हायस्कूलचे शिक्षक प्रकाश चिव्हाने, अतुल दांडेकर, प्रशांतअहिरकर, राजेश भोयर, बंडु शिवणकर,कलावती ठाकरे,देवेंद्र झीले, जिवन गोहकार,भास्कर पाटील, प्रथमेश राऊत, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे,देवानंद सोनोने,व दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.