Breaking News

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचा – एक सलाम वर्दीला

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो, निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य – अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही. हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेत. आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता अहोरात्र जागून त्याचबरोबर वेळप्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावून सीमेचं रक्षण करतात ते आपल्या देशाचे जवान त्याचप्रमाणे कोणाही नागरिकाला कोणताही गंभीर आजार असो त्या रूग्णाला वाचविण्यासाठी आपले सारे वैद्यक कसब पणाला लावून व त्याची अहोरात्र सेवासुश्रुषा करून त्याचे प्राण वाचवितात हेे आपल्या साठी माणसातील देवमाणूसच आहेत. या देवमाणसाची प्रचिती आपण सर्वांनी कोरोना महामारी काळात घेतली आहेच.

अशा या माणसातील देव माणसांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेच. म्हणूनच आपल्याला अभिमानास्पद असणा-या माणसातील देव माणसाची सेवा म्हणून त्यांच्या युनिफॉर्मची (वर्दीची) ड्रायक्लिनींग सुविधा १५ऑगष्ट ह्या स्वातंत्र्यदिनी केवळ एक रूपया सेवामूल्य घेऊन करण्याचे कॉर्पोरेट तसेच मध्यम वर्गात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या *आयन फिल* या लॉंड्री सेवा देणा-या संस्थेमार्फत ड्रायक्लिनींग सेवा देण्यात येणार आहे.*आयन फिल* ने गतवर्षीही ही योजना राबविली होती तेव्हा यास प्रचंड प्रतिसाद लाभला होता.

वर्दीतील देवमाणसांच्या कार्याला सलाम म्हणून यंदाच्या स्वातंत्र्यदिनीही ही योजना राबविण्याचे ठरविले असून देशाची सेवा करणारे जवान, पोलीस, डॉक्टर, परिचारिका यांनी या ड्रायक्लिनींग सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे *आयन फिल चे उदय पवार* यांनी आग्रहाचे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी ७३०४६७८४८४
८४२२८९८९०२ या क्रमांकावर संपर्क करावा.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार आरोपींना उत्तरप्रदेशामध्ये अटक

शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे सापळा रचून पकडले ‘नगर …

पिडीत वैद्यकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन

कलकता येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन चिमूर येथील डॉक्टराच्या आयएमए, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved