Breaking News

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई – बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून सरकारविरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे तेथे अराजक माजले आहे. या सरकारविरोधी आंदोलनात जिहादी आणि कट्टरतावादी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंची घरे आणि दुकानांवर आक्रमणे करून ते लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होत आहे आणि तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण अजूनही आहे. बांगलादेशमधील हिंदूंची विदारक स्थिती पाहता हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशातील समाजकंटकांवर भारत सरकारने कारवाई करावी आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी !, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ 11 ऑगस्ट या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मानव सेवा प्रतिष्ठान, वज्र दल, योग वेदांत समिति, सुयश मित्र मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक कार्याध्यक्ष रणजित सावरकर यावेळी म्हणाले, ‘बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी. भारताने बांगलादेशमध्ये सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूबहुल भाग भारताला जोडावा.’ ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो नाही, तर भारतातील हिंदूंचेही भवितव्य धोक्यात आहे, असे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक यावेळी म्हणाले. तर मानवाधिकार कार्यकर्ते महेश वासू म्हणाले, ‘बांगलादेशातील स्थिती हिंदूंची अत्यंत भयावह आहे. भारतातील हिंदूंपर्यंत हा अत्याचार पोचवायला हवा.हिंदूंच्या नरसंहाराविषयी बांगलादेशी प्रसारमाध्यमे गप्प आहेत.’

बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या बांगलादेशमध्ये स्थापन झालेले अंतरिम सरकार आणि सैन्य दल यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हिंदूंना तातडीने सुरक्षा पुरवून आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी आदी मागण्या पूर्ण होण्यासाठी भारत सरकराने सध्याच्या बांगलादेशमधील अंतरिम सरकारवर दबाव आणावा असे या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी आवाहन केले.बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात बांगलादेश, संयुक्‍त राष्‍ट्रांचे मुख्‍यालय यांसह जगातील विविध ठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. हिंदूंच्या नरसंहाराचे गांभीर्य लक्षात घेता भारत सरकारनेही हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) भारत सरकारने आश्रय द्यावा. आदी मागण्याही भारत सरकारकडे या हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलनात केल्या आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved