जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्काऊट गाईड व रोव्हर रेंजर पथक चिमूरच्या वतीने आयोजित रक्षाबंधनाचा स्काऊट गाईड पथकांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्यानी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले घेतले.भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सन रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा होत असतो. नेहरू विद्यालय चिमूर येथे हा सन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नेहरू विद्यालय स्काऊट गाईड पथकाने कलात्मक राखी स्वतः बनउन विद्यार्थ्यांनी अद्भभूत कलाकृतीचे यावेळी प्रदर्शन केले. रक्षाबंधन, वृक्ष संवर्धन राखी, पुष्प सजावट, वृक्ष लागवड व राखी महोत्सवाने स्काऊट गाईड पथकाने रक्षाबंधन साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू विद्यालयचे मुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख तुळशीदास महलले,व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष श्रीहरी सातपुते, स्काऊट गाईड समन्वयक परमानंद बोरकर, पत्रकार सुनील हिंगणकर,पर्यवेक्षिका सुजाता धोपटे. मंचकावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्काऊट गाईड समन्वयक परमानंद बोरकर यांनी स्काऊट गाईडची निर्मिती व स्काऊट गाईडचे कार्य व पर्यावरण पूरक राखीचे महत्व समजावून सांगितले. प्रमुख अतिथी केंद्र प्रमुख तुळशीदास महलले यांनी नेहरू विद्यालय हे शिक्षणाचे माहेरघर आहे. सर्वात जास्त अधिकारी. व्यावसायिक विद्यार्थि घडविणारी ही शाळा असून केवळ शिक्षण न देता विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात प्रगतीवर नेणारी शाळा असून या शाळेचा नावलौकिक वाढवावा असे वक्तव्य या वेळी केले.
प्रमुख अतिथी श्रीहरी सातपुते यांनी मार्गदर्शनात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. व विद्यार्थ्यांना शाळेचे नियम पाळून आदर्श विद्यार्थी बनून शिक्षण घेऊन आदर्श व्यक्ती व्हा असा सल्ला या वेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष निशिकांत मेहरकुरे यांनी स्काऊट गाईड पथकाने आतापर्यंत राबविल्या उपक्रमाबद्दल स्काऊट गाईड पथकाचे कौतुक केले. व मुख्याध्यापक या नात्याने पुढील उपक्रमासाठी पाहिजे ते सहकार्य करण्याचे विद्यार्थ्यांना वचन दिले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधल्याचा आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हंसिका गोहणे. आरिया स्वान यांनी केले तर आभार प्रदर्शन दिव्यांनी पारेकर यांनी केले.