Breaking News

अन्न व औषध प्रशासनातर्फे 3 लक्ष 27 हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखु इत्यादी अन्नपदार्थांच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी घातलेली असून 12 जुलै 2024 च्या अधिसुचनेनुसार सन 2024-25 मध्ये देखील उपरोक्त प्रतिबंध ठेवला आहे. जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अधिसूचनेतील नमूद तरतुदींची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येत असून 3 लक्ष 27 हजार 285 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी.सातकर यांनी 22 ऑगस्ट रोजी हाजी अनवर रज्जाक आलेख (विक्रेता) वार्ड क्र. 6, झुल्लूरवार कॉम्प्लेक्स मागे, गडचांदूर येथे तपासणी केली असता होला हुक्का शिशा तंबाखु (सुगंधित तंबाखु), ईगल हुक्का शिशा तंबाखु, मजा 108 हुक्का शिशा तंबाखु, विमल पानमसाला इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीकरीता साठविल्याचे आढळून आले. सदर अन्नपदार्थांचे अनौपचारिक नमुने विश्लेषणास्तव घेवून उर्वरीत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा एकूण किंमत 3 लक्ष 27 हजार 285 रुपये, प्रतिबंधित करून ताब्यात घेतला आहे. सदर घटनेबाबत गडचांदुर पोलिस स्टेशन येथे एफआयआर नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपूर जिल्हयातील कोणीही प्रतिबंधित अन्न पदार्थ जसे खर्रा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, सुगंधित सुपारी संबंधित कोणताही व्यवसाय करु नये, अन्यथा कठोर कारवाई घेण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी. सातकर यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved