माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी धरले प्रशासनाला धारेवर कॉ. संजय नागरे यांनी घेतला गटारीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद विद्याताई गाडेकर यांनी पाण्यात फिरुन घेतल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील हॉटेल शौकीन जवळील नाला तुंबल्याने शहरातील सर्व प्रमुख राज्य महामार्गावरील गटारीचे पावसाळा पूर्वी साफसफाई न झाल्याने व अनेक व्यापाऱ्यांनी गटारी वर अतिक्रमण केल्याने शहरातील गटारी तुंबल्या आहेत काल शनिवार दिनांक 24 ऑगष्ट 2024 रोजी सायंकाळी चार ते सहा शहरात आणि परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने खंडोबा नगर वडार गल्ली शास्त्रीनगर व निम्या शहराचे पावसाचे आणि गटारीचे पाणी या नाल्यात हॉटेल शौकीन जवळ येत असल्याने तिथे जलाशयाचे स्वरूप आले होते.
अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते खत विक्रेते जगदीश शेठ दूध यांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्याने माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी त्या ठिकाणी अचानक भेट देऊन व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या याची गंभीर दखल घेऊन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे व प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी शेवगाव पाथर्डी प्रसाद मते यांच्यावर फोनवरून संपर्क साधून कान उघाडणी केली.
त्यानंतर काल झालेल्या पावसामध्ये कॉम्रेड संजय नागरे यांनी नगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला माजी आमदार शेखर भाऊ यांनी परिसरातील व्यापाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी देऊन व्यथा जाणून घेतल्या या सर्व घटना क्रमाने नगरपरिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि आज सकाळी नाले सफाई ला सुरुवात केली शेवगाव नगरपरिषदेची अवस्था कायमच “वराती मागून घोडे” अशी राहिलेली आहे नगरपरिषद शेवगावला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही जे कर्मचारी पाथर्डी नगरपरिषद मध्ये नियुक्तीस आहेत तेच शेवगाव नगरपरिषद मध्ये लुडबुड कारभार पाहतात विद्यमान लोकप्रतिनिधीच्या ताटाखालील मांजर असल्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय ते कागदाला हात सुद्धा लावत नाहीत अशी परिस्थिती आहे, वास्तविक पाहता पावसाळापूर्व नाले सफाई होणे गरजेचे होते परंतु संबंधित ठेकेदार नगरपरिषद आरोग्य विभाग व प्रभारी मुख्याधिकारी यांचे साटेलोटे असल्यामुळे पावसाळापूर्व नाले सफाई न करताच थातुर मातूर कामे दाखवून लाखोंचे बिल आता करण्यात आले याला जबाबदार कोण ???
*ताजा कलम*
नगरपरिषद प्रशासन जर शेवगावचे नाले सफाई करण्यास असमर्थ असेल तर मी स्वखर्चाने सगळे नालेसफाई करून देतो अशी टोकाची भूमिका माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी घेतल्यानंतर नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामाला लागले नगरपरिषद प्रशासनाचा कारभार आंधळे दळतंय आणि कुत्रे पीठ खाते असा गेली कित्येक वर्षे सुरू असून कोणाचाही अंकुश नसल्यामुळे लाखोंची बिल काम न करता बिनबोभाट निघत आहेत याची खातेनिहाय सखोल चौकशी व्हायला पाहिजे.
*क्रमशः*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*